Sangli Bribe Case Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Bribe Case : गुंठाभर जमीन नावावर करण्यासाठी ५० हजारांची मागणी; सांगलीतील तलाठ्यासह दोघांना अटक

Sangli Talathi Bribe : सांगली जिल्ह्यात लाच घेण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दरम्यान, १ गुंठा शेत जमीन सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.

sandeep Shirguppe

Sangli Crime News : सांगली जिल्ह्यात लाच घेण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दरम्यान, १ गुंठा शेत जमीन सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी मिरज तालुक्यातील कर्नाळच्या तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता.२१) अटक केली. तलाठी तानाजी पांडुरंग फराकटे (वय ४९) एसटी कॉलनी, विश्रामबाग व एजंट गणेश विश्वास कांबळे (वय ३०) पद्माळे, अशी दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदाराने कर्नाळ येथे १ गुंठा जमीन खरेदी केली होती. याची सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यासाठी तलाठी फराकटे यांची भेट घेतली. तेव्हा फराकटे याने ५० हजार रुपयांची मागणी केली. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २८ जानेवारी २०२५ रोजी देण्यात आली होती.

तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २९ व ३० जानेवारी रोजी पडताळणी केली. तेव्हा तलाठी फराकटे याने पंचाच्या समक्ष ५० हजार रुपये लाच मागितली, तसेच तडजोडीअंती ४० हजारांची मागणी करून एजंट गणेश कांबळे याला जाऊन भेटण्यास सांगितले, असे स्पष्ट झाले.

शिवाय पडताळणी दरम्यान एजंट कांबळे यानेही तक्रारदार यांच्या कामासाठी ५० हजार रुपये मागितले आणि रक्कम कमी करण्याची विनंती केली असता, त्यानेही तलाठी कांबळे यांना भेटा, असे सांगून लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

दोघांनी प्रत्यक्षात लाच स्वीकारली नाही, परंतु लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यामुळे गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई आज २१ मार्च रोजी करण्यात आली. उपाधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक किशोरकुमार खाडे, कर्मचारी ऋषिकेश बडणीकर, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव आदींच्या पथकाने कारवाई केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Compensation: आंबा-काजू उत्पादकांच्या भरपाईवरून कृषिमंत्र्यांना घेरले

PACS Computerization: बारा हजार सोसायट्यांचे संगणकीकरण पूर्ण

Maharashtra Sowing Update: राज्यात केवळ तीन टक्के पेरण्या

Maharashtra Rain Forecast: राज्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT