Carrot Arrival Agrowon
ॲग्रो विशेष

Carrot Arrival : चाकणला राजस्थानच्या गाजराची वीस टन आवक

Carrot Rate : येथील महात्मा फुले बाजारात राजस्थान राज्यातून रविवारी (ता. ४) मोठ्या प्रमाणात जोधपूरी गाजराची आवक झाली.

Team Agrowon

Pune News : येथील महात्मा फुले बाजारात राजस्थान राज्यातून रविवारी (ता. ४) मोठ्या प्रमाणात जोधपूरी गाजराची आवक झाली. गाजराची वीस टन आवक झाली. गाजराला घाऊक बाजारात प्रति किलोला १५ रुपये भाव मिळाला. भाव मात्र पाच रुपयाने वाढले आहेत.

बटाट्याला घाऊक बाजारात भाव प्रति किलोला दहा ते पंधरा रुपये मिळाला. बटाट्याचे भाव सध्या घसरत आहेत. स्थानिक काढणी केलेल्या बटाट्याची आवक अल्प प्रमाणात आहे. हिरव्या मिरचीची नागपुरातून सुमारे पन्नास टनावर आवक झाली. हिरव्या मिरचीला घाऊक बाजारात प्रति किलोला चाळीस ते पन्नास रुपये भाव मिळाला. कांद्याची आवक साडेचार हजार क्विंटल झाली.

कांद्याला घाऊक बाजारात दहा ते पंधरा रुपये प्रति किलोला भाव मिळाला. कांद्याचे भाव घसरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

लसूनाची आवक गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या परराज्यातून होत आहे. ही आवक फक्त २५ टन झाली. लसूनाचे भाव दिवसेंदिवस स्थिर आहेत. घाऊक बाजारात लसूण अजूनही दोनशे रुपये प्रति किलोने विकला जात आहे. किरकोळ बाजारात लसूण मात्र तीनशे ते चारशे रुपये प्रती किलोने विकला जात आहे.

ही मोठी भाव वाढ आहे. लसूनाचे भाव वाढल्याने मागणी मात्र कमी आहे. सामान्य ग्राहकाला मात्र याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. पुढील महिन्यात लसूनाची काढणी केल्यानंतर भाव घसरतील, अशी शक्यता शेतकरी, व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

कांद्याची घाऊक बाजारात आवक सुमारे साडेचार हजार हजार क्विंटल झाली. भाव प्रति किलोला पंचवीस रुपयांनी घटले आहेत. कांद्याला घाऊक बाजारात प्रति किलोला भाव दहा ते पंधरा रुपये मिळाला. येथील महात्मा फुले बाजारात इंदूर येथील नव्याने काढणी केलेल्या व आग्रा, गुजरात येथील शीतगृहात साठवणूक केलेल्या बटाट्याची मोठी आवक होत आहे.

ही आवक स्थानिक परिसरातील आवकेपेक्षा मोठी आहे. बटाट्याची सुमारे सोळाशे पन्नास क्विंटल आवक झाली. टोमॅटोची आवक सुमारे पन्नास टन झाली. टोमॅटोची आवक कर्नाटक राज्यातून तसेच नाशिक, लातूर जिल्ह्यातून होत आहे. टोमॅटोला प्रतिकिलोला घाऊक बाजारात तीस ते पस्तीस रुपये भाव मिळाला. टोमॅटोचे घाऊक बाजारात भाव पुन्हा वाढले आहेत.

फळभाज्यांचे एका किलोचे भाव (रुपयांत) पुढील प्रमाणे

हिरवी मिरची - ४० ते ५०, भावनगरी हिरवी मिरची -३५ ते ४०, हिरवा वाटाणा - ४०, भेंडी - ४०, टोमॅटो -३५, गवार -६०, फ्लॉवर ७ ते ८, कोबी ७ ते ८, दुधी भोपळा १० ते १५, पडवळ- १००, राजमा वाल -४०, तुरमुड्या वाल - ३५ ते ४०, चवळी ३०, शेवगा -६०, ढोबळी मिरची -४० ते ४५, आद्रक - ९०, तोंडले -३०, डांगर भोपळा - १५, वांगी - १०, काकडी -२५, गाजर -१५ रुपये.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT