Agriculture Drone Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Drone : दोन वर्षांत बारा हजार लोकांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देणार

Drone Subsidy : शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त ड्रोनचा वापर करावा यासाठी राज्य सरकारच्या मदतीने दोन वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त ड्रोनचा वापर करावा यासाठी राज्य सरकारच्या मदतीने दोन वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी ही माहिती दिली. उसाच्या उत्पादनात एकरी शंभर टन उत्पादन घेण्यासाठी सातारा जिल्ह्यात विशेष उपक्रम राबवला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी विद्यापीठाने केलेल्या विविध उपक्रमाची तसेच नव्याने प्रस्तावित असलेल्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद झाली. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, कुलसचिव विजय पाटील व सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार उपस्थित होते. डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, ‘‘महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ५५ वर्षांमध्ये शेती आणि शेतकऱ्यांसाठी खूप मोठे काम केले आहे.

विद्यार्थी व शेतकरी केंद्रबिंदू म्हणून काम करत विविध बाबी शेतकऱ्यांसाठी उभ्या केल्या. दहा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात १५ विद्यापीठाचे व ६६ खासगी महाविद्यालय आहेत. २३ हजार ३९६ विद्यार्थी यात शिक्षण घेतात. बदलत्या काळानुसार शेतीत अधिक तंत्रज्ञान वापरात यावे यासाठी विद्यापीठाचा प्रयत्न आहे.

त्याला राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची जोड मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ड्रोनचा वापर करावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीने पाच वर्षांत दोन लाख लोकांना प्रशिक्षित करण्याचा संकल्प आहे.

दोन वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असून त्याचा खर्च राज्य शासन करणार आहे. देशात ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण देणारे साठ प्रशिक्षण केंद्रे आहेत. आत्तापर्यंत १५ हजार लोकांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण मिळाले आहे. राज्यात ड्रोनचे प्रशिक्षण देणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ एकमेव केंद्र आहे. येथे आतापर्यंत १११ लोकांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण मिळाले आहे. प्रशिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढविण्यासाठी शासन विशेष उपक्रम राबवणार आहे.

उसाच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठीही विद्यापीठाच्या माध्यमातून उपक्रम राबवले जात असून सातारा जिल्हा सहकारी बँक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मिटकॉन आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने यांच्या पुढाकाराने एकरी १०० टन उसाचे उत्पादन घेण्यासाठी २१ कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बांधकाम विभागावर झालेले आरोप तसेच अन्य बाबीबाबत महिनाभरात माहिती देऊन सविस्तर बोलेल असे डॉ. पाटील म्हणाले.

गाडीबाबत केला खुलासा

कुलगुरूंनी नियमबाह्य निधी खर्च करून गाडी घेतल्याचा सातत्याने आरोप होत होता. त्याबाबत कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी खुलासा केला. ते म्हणाले, ‘‘आरोपानंतर मी संबंधित निधी परत पाठवला व कुलगुरूंना अधिकार असलेल्या पैशातून गाडी घेतली.

दहा जिल्ह्यांचा व्याप, त्याचबरोबर जुनी गाडी खराब झालेली होती. त्या गाडीचा तीन वेळा अपघात झाला होता, या सर्व बाबींचा विचार करून कुलगुरूंसाठी नवीन गाडी घेतली यात गैर काहीही नाही.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT