Turmeric  Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Cultivation : राज्यात हळद लागवड पडली लांबणीवर

Turmeric Farming : राज्यातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहेच. गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढू लागली आहे. शेतकऱ्यांनी हळद लागवडीसाठी पूर्वतयारी केली असून, शेतकरी पावसाची प्रतीक्षा करू लागले आहेत.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : राज्यातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहेच. गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढू लागली आहे. शेतकऱ्यांनी हळद लागवडीसाठी पूर्वतयारी केली असून, शेतकरी पावसाची प्रतीक्षा करू लागले आहेत. त्यातच पाणीटंचाई आणि वाढत्या उष्णतेचा फटका हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसू लागला असल्याने यंदाच्या हंगामात हळद लागवड एक महिना लांबणीवर पडणार आहे.

दोन वर्षांपूर्वी राज्यात हळद लागवड करणाऱ्या पाण्याची कमतरता नव्हती. हळद लागवडीस तापमानही अधिक होते. परंतु तापमानात चढ-उतार होत होती. त्यामुळे एप्रिल महिन्यात लागवडपूर्व मशागती पूर्ण करून सऱ्याही सोडल्या होत्या.

शेतकऱ्यांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधला होता. तर इतर भागांत मेच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात हळद लागवडीस प्रारंभ झाला होता. जून महिन्यात हळद लागवडीस गती आली होती. मुळात गतवर्षी पाण्याची टंचाई होती. परंतु उपलब्ध पाण्यामुळे हळद पीक तग धरून होते.

यंदाच्या हंगामात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अक्षय तृतीयेला हळद लागवडीचा मुहूर्त साधतात. तर इतर भागात मे दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापासून हळद लागवड करण्याचे नियोजन शेतकरी करतात. यंदा मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होऊ लागली आहे.

एप्रिल महिन्यात उष्णता वाढली आहे. हळद पिकासाठी २५ ते २८ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. परंतु तापमान ४० अंशांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गतवर्षी पाऊस कमी झाला. त्यामुळे या वर्षी पाण्याचे मुख्य संकट ओढावले आहे. वास्तविक पाहता, पाणीटंचाई असली, तरी पश्‍चिम महाराष्ट्रात सध्या पुरेसे पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लागवड करण्याचे दृष्टीने पूर्वमशागती पूर्ण केल्या आहेत. तर काही भागात हळद लागवडीसाठी सऱ्याही सोडल्या आहेत. परंतु लागवडीनंतर पाणी अपुरे पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या हळद लागवड थांबवली आहे.

सध्या शेतकरी पावसाची प्रतीक्षा करू लागला आहे. त्यातच तापमानात वाढीचा फटका हळद लागवडीवर झाला आहे. त्यामुळे राज्यात हळद लागवड एक महिना लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांची सावध पावले

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हळदीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. हळदीला दराची झळाळी आहे. त्यामुळे शेतकरी हळद लागवड करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. काही शेतकरी हळदीच्या क्षेत्रात वाढ करण्याचे नियोजनही करत आहेत. परंतु पाण्याची कमतरता आणि वाढते तापमान यामुळे हळद लागवड करण्यासाठी शेतकरी सावध पावले टाकत आहेत.

बियाणे मागणी झाली कमी

हळदीचे बियाण्याच्या उत्पादनात घट आहे. यंदा पाण्याचे संकट आहेच. परिणामी, पाणीटंचाई आणि वाढती उष्णता यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हळद लागवड करण्याची इच्छा असूनही शेतकऱ्यांनी हळद बियाणे खरेदी करणे सध्या थांबवले आहे. तापमान कमी झाल्यानंतर आणि पाऊस पडल्यानंतरच बियाणे खरेदीसाठी शेतकरी पुढे येतील, असा अंदाज हळद बियाणे व्यापाऱ्यांनी सांगितले.

हळद उगवण्यासाठी ३२ अंश तापमान लागते, तरच हळदीची उगवण चांगल्या प्रकारे होते. हळद लागवडीनंतर एक महिना २५ ते २८ अंश तापमानाची गरज असते. या कालावधीत कंद तग धरून राहते.
डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन केंद्र, कसबेडिग्रज, जि. सांगली
हळदीचे बियाणे स्वच्छ केले आहे. लागवडीसाठी सरीही सोडली आहे. हळद लागवडीसाठी पावसाची प्रतीक्षा करतो आहे.
मनोज पाटील, हळद उत्पादक शेतकरी पोखर्णी, ता. वाळवा, जि. सांगली
हळद पिकास पुरेसे पाणी आहे. त्यातच तापमान वाढले आहे. तसेच हळदीची लागवड केल्यास पाणी कमी पडेल या भीतीने लागवड थांबवली आहे.
राजेंद्र गायकवाड,हळद उत्पादक शेतकरी, भुईंज, जि. सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT