Turmeric Productivity : हळद उत्पादकतेत वाशीम जिल्ह्याची यशस्वी वाटचाल

Team Agrowon

हळद पिकात वाशीम जिल्हा अग्रणी ठरत आहे. सन २०१० ते २०१२ च्या काळात सरासरी १००० ते १५०० हेक्टर असलेले क्षेत्र आजमितीला आठ ते दहा हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे.

Turmeric Productivity | Agrowon

पिकाचे हे महत्त्व लक्षात घेता वाशीम- करडा कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) हळदीची उत्पादकता व गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी उत्पादन तंत्रातील बारकाव्यांचा अभ्यास करून त्याचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार केला.

Turmeric Productivity | Agrowon

आजमितीला साडेतीनशे शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचविण्यात आल्याचे केव्हीकेचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील सांगतात. त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केव्हीकेने मार्गदर्शन केले.

Turmeric Productivity | Agrowon

‘आत्मा’च्या सहकार्याने हंगामात शेतीशाळा, प्रयोग व प्रात्यक्षिके घेतली.

Turmeric Productivity | Agrowon

एकरी सरासरी उत्पादकता २२ ते २५ क्विंटल (वाळवलेली) मिळू लागली. सर्वाधिक उत्पादकता ४० ते ४८ क्विंटलपर्यंत पोहोचली.

Turmeric Productivity | Agrowon

लागवडीसाठी सेलम, व काही ठिकाणी पीडीकेव्ही वायगाव या वाणाचा वापर करण्यात आला.

Turmeric Productivity | Agrowon

योग्य व्यवस्थापनामुळे वाशीम जिल्ह्यात हळदीची एकरी सरासरी उत्पादकता २२ ते २५ क्विंटल (वाळवलेली) मिळू लागली. सर्वाधिक उत्पादकता ४० ते ४८ क्विंटलपर्यंत पोहोचली आहे.

Turmeric Productivity | Agrowon