Tur Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Procurement : हमीभावाने २ ६०२ क्विंटल तूर खरेदी

Tur Market : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील पणन महासंघ अंतर्गंत ३३ पैकी ७ खरेदी केंद्रांवर शुक्रवार (ता. २८) पर्यंत १९७ शेतकऱ्यांची २ ६०२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील पणन महासंघ अंतर्गंत ३३ पैकी ७ खरेदी केंद्रांवर शुक्रवार (ता. २८) पर्यंत १९७ शेतकऱ्यांची २ ६०२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. या दोन जिल्ह्यातील ३३ केंद्रावर तूर विक्रीसाठी ३ हजार १४७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

परभणी जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी परभणी जिल्ह्यासाठी प्रतिहेक्टरी १०.५० क्विंटल उत्पादकता निश्चित करण्यात आली असून १० हजार २२५ टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे. केंद्रीय नोडल एजन्सी नाफेडच्या (राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ) वतीने हमीभावाने तूर खरेदी करिता राज्य सहकरी पणन महासंघ अंतर्गंतच्या परभणी, पेडगाव, झरी, वरपुड, जिंतूर, बोरी, भोगाव, सेलू, मानवत, रुढीपाटी, पाथरी, देवनांदरा, सोनपेठ, पालम, चाटोरी, पूर्णा, एरंडेश्वर, ताडकळस या १८ केंद्रावर १ हजार ३६३ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून ७७५ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर तूर घेऊन येण्यासाठी एसएमएस (संदेश) पाठविण्यात आले.

शुक्रवार (ता. २८) पर्यंत पेडगाव, बोरी, सेलू, रुढी पाटी या ४ केंद्रावर १५१ शेतकऱ्यांची १ हजार ८०४ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. या तुरीची किंमत १ कोटी ३६ लाख २० हजार २०० रुपये होते. हिंगोलीसाठी प्रतिहेक्टरी ११.५० क्विंटल उत्पादकता निश्चित करण्यात आली असून ८ हजार ८६५ टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे.

केंद्रीय नोडल एजन्सी एनसीसीएफच्या (राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ) वतीने तूर खरेदी करिता राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गंत हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव, साखरा, शिवणी खुर्द, फाळेगाव, नागासिनगी, आडगाव, उमरा, पुसेगाव या १५ केंद्रांवर १ हजार ७८४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून ८४४ शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर तूर घेऊन येण्यासाठी एसएमएस पाठविण्यात आले.

शुक्रवार (ता.२८) पर्यंत कनेरगाव, सेनगाव, नागसिनगी या ३ केंद्रांवर ४६ शेतकऱ्यांच्या ७९८.५० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. या तुरीची किंमत ६० लाख २८ हजार ६७५ रुपये होते. खुल्या बाजारातील तुरीचे दर ६५०० ते ७५०० दरम्यान आहेत. विविध कारणांनी तुरीची उत्पादकता घटली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर घेऊन येण्याचा संदेश पाठविल्यानंतरही शेतकरी तूर आणत नाहीत. त्यामुळे अद्याप या दोन जिल्ह्यातील २६ केंद्रावर तूर खरेदी सुरु झालेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT