Tur  Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Sowing : खानदेशात तूर लागवड वाढली; पीक फुलोऱ्यावर

Tur Cultivation : खानदेशात तूर पीक फुलोऱ्यावर आले आहे. पीकस्थिती चांगली आहे. शेतकरी अळीनाशके, बुरशीनाशके, कीटकनाशकांची फवारणी त्यात घेत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात तूर पीक फुलोऱ्यावर आले आहे. पीकस्थिती चांगली आहे. शेतकरी अळीनाशके, बुरशीनाशके, कीटकनाशकांची फवारणी त्यात घेत आहेत. तूर लागवड खानदेशात यंदा वाढली आहे.

मागील हंगामात कमी पावसातही तूर पीक बऱ्यापैकी आले. तसेच तुरीला दरही चांगले मिळाले. तूर दर टिकून होते. यामुळे यंदा अनेक शेतकरी तुरीकडे वळले. तूर लागवड यंदा वाढली. जळगाव जिल्ह्यातील लागवड ११ हजार हेक्टरवर पोहोचली आहे. अनेकांनी तूर व सोयाबीनचे मिश्र पीक घेतले आहे.

धुळे व नंदुरबारमध्ये मिळून सुमारे तीन हजार हेक्टरवर तूरलागवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, अमळनेर आदी भागांत मुख्य पीक म्हणून तूरलागवड केली. धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, साक्री, नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर भागात तूर अधिक आहे. जळगावातील रावेर, मुक्ताईनगर आदी भागांत जूनमध्येच ठिबक सिंचनच्या साह्याने पूर्वहंगामी तुरीची जूनमध्ये लागवड झाली आहे.

पाऊसमान चांगले राहिले, यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील तूरही जोमात आहे. अनेकांनी दोन वेळेस तुरीला बेसल डोस दिला आहे. तसेच पावसासह ढगाळ व विषम वातावरण अनेक दिवस राहिल्याने किडींची समस्याही आहे. यामुळे तूर पिकात दोन-तीन फवारण्याही घ्याव्या लागल्या आहेत. फवारणीतूनही विविध खते शेतकऱ्यांनी तूर पिकास दिली आहेत.

तूर पिकाची चांगली वाढ झाल्याने सध्या त्यात बैलांकरवी आंतरमशाग करणे शक्य नाही. अनेकांचे तूर पिकातील उडीद, सोयाबीनचे आंतरपीक हाती आले आहे. हे पीक काढल्यानंतर त्यात तणही होते. तणनियंत्रणही शेतकऱ्यांनी केले आहे. काही दिवसांपासून पाऊस नसल्याने पिकात फवारणीची कामेही गतीने झाली. पिकात लवकरच किंवा दिवाळीच्या काळात शेंगा दिसू लागतील, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT