Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : सिंदखेडराजा येथे तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनास सुरुवात

Farmer Issues : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारपासून (ता. चार) येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

Team Agrowon

Buldhana News : सोयाबीन, कापूस दर, पीकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्यांना १०० टक्के नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारपासून (ता. चार) येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता जिजाऊंच्या पुतळ्याचे दर्शन घेत त्यांनी राजवाडा समोरील भागात हे आंदोलन सुरू केले.

या वेळी बोलताना तुपकर म्हणाले, की ही लढाई एकट्याची नसून संपूर्ण शेतकऱ्यांच्या न्याय हक्काची लढाई आहे. त्यामुळे आता नुसता पाठिंबा देऊ नका तर या आंदोलनात सहभागी व्हा. आपल्या आंदोलनाचा श्‍वास सोयाबीन- कापूस आहे.

आता आपला कोणी नेता नाही त्यामुळे आपला लढा आपल्यालाच पुढे न्यावा लागणार आहे. आता सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसायचे नाही. असे सांगत हे आंदोलन टप्प्याटप्प्याने पेटणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा अद्याप जमा झाला नाही. नेते तारखांवर तारखा देत आहेत.

३१ ऑगस्टपर्यंत पीकविम्याची रक्कम जमा होईल असे नेते सांगत होते. तसेच राज्यभरात विविध ठिकाणी वेगवेगळी आंदोलने केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुवारी (ता. ५) सर्व शेतकरी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी, तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देतील. शुक्रवारी (ता.६) महाराष्ट्रातल्या गावागावांत प्रभातफेऱ्या निघतील. शनिवारी (ता.७) गावागावांत ग्रामपंचायतीचे ठराव घेतले जाणार आहेत.

तर रविवारी (ता. ८) महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची घोषणा या वेळी तुपकर यांनी केली. समृद्धी महामार्ग देखील अडवू असे सांगत समृद्धी महामार्गावर बैलगाड्या घेऊन घुसू असा इशारा दिला. शेतकरी- शेतमजुरांनी या आंदोलनाला समर्थन दिले पाहिजे. ‘सपोर्ट फॉर फार्मर’ अशी एक मोहीम सोशल मीडियावर राबवा असे आवाहन तुपकरांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT