Pratap Sarnaik  Agrowon
ॲग्रो विशेष

MSRTC Hotel Inspection : परिवहन मंत्र्यांची हॉटेल थांब्यांना अचानक भेट

Minister Pratap Sarnaik : परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूर दौऱ्यावर असताना पुणे-सोलापूर महामार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना अचानक भेट दिली.

Team Agrowon

Solapur News : ः परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूर दौऱ्यावर असताना पुणे-सोलापूर महामार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना अचानक भेट दिली. तेथील प्रवासी व एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांना मिळणारे अन्नपदार्थ ताजे आहेत का, अन्नपदार्थ वाजवी दरात मिळतात का, तसेच महामंडळाची नाश्ता योजना चालू आहे का, याची चौकशी केली.

या पाहणी दौऱ्यात त्यांनी तेथील प्रसाधनगृहांचीदेखील आवर्जून पाहणी केली. या वेळी महिला प्रवाशांनी प्रसाधनगृहाच्या अस्वच्छतेबाबत तक्रार नोंदवली. त्याची तातडीने दखल घेत मंत्री सरनाईक यांनी सदर प्रसाधनगृहे तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित हॉटेल मालकाला दिले. तसेच आढळलेल्या इतर त्रुटींबाबत संबंधित मालकाला विहित वेळेत त्या दूर करण्याचे निर्देश दिले.

अन्यथा, सदर हॉटेल थांबा नाईलाजाने रद्द करण्याचे निर्देश देऊ, असे सांगितले. दरम्यान, हे हॉटेल थांबे ज्या पुणे विभागात येतात त्या विभाग नियंत्रकांशी संपर्क साधून या हॉटेल थांब्यांच्या त्रुटींची पूर्तता पुढील एक महिन्यात करण्याचे निर्देश दिले.

...तर चालक-वाहकांवर कारवाई

भिगवणजवळील एका अनधिकृत हॉटेल थांब्यावर एसटीच्या अनेक बसेस थांबलेल्या परिवहनमंत्री सरनाईक यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तेथे भेट देऊन पाहणी केले असता, अत्यंत अस्वच्छ वातावरणात प्रवाशांना जेवण वाढले जात असल्याचे त्यांना दिसून आले. याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधित वाहन, चालकांवर कडक कारवाई करावी, असे एसटीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT