Agriculture Transformer Agrowon
ॲग्रो विशेष

Mahavitaran : ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी तक्रारीची सुविधा आता महावितरणच्या ॲपवर

Agriculture Electricity : ट्रान्सफॉर्मर जळाला अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या ॲपचा वापर करून खबर द्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Team Agrowon

Nashik News : ट्रान्सफॉर्मर जळाला अथवा बिघडल्यास तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर त्या जागी बसविण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणच्या ॲपचा वापर करून खबर द्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. यामुळे खबर मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसांत बिघडलेला ट्रान्सफॉर्मर बदलला जात आहे.

तथापि, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरबद्दल माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने ग्राहकांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी महावितरणच्या मोबाइल  ॲपवरील  सुविधा  वापरणे  ग्राहकांसाठी  सोपे  ठरू  शकते.

जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी ट्रान्सफॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे,  दुरुस्त ट्रान्सफॉर्मरचा साठा करणे असे उपाय केले. ट्रान्सफॉर्मर बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालय स्तरावर दररोज घेण्यात येतो.

ॲपवरून अशी करा तक्रार 

मोबाइलवर ‘महावितरण’ हे ॲप उघडा.

नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवा या बटणावर क्लिक करा.

ग्राहकाचे नाव, नंबर दिसेल त्यावर क्लिक करा.

ट्रान्सफॉर्मरजवळची खूण कोणती आहे, कधीपासून ट्रान्सफॉर्मर बंद आहे आणि कोणता बिघाड दिसतो याची माहिती भरा.

संबंधित ट्रान्सफॉर्मरचा फोटो काढून अपलोड करा.

नोंद करा किंवा सबमिट हे बटण दाबा.

ट्रान्सफॉर्मरची तक्रार नोंदविली जाईल. त्याची नोंद थेट महावितरणच्या मुख्य सर्वरमध्ये होईल. तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल.

ट्रान्सफॉर्मर बदलला की, त्याची माहिती ग्राहकाला एसएमएसद्वारे दिली जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT