Mosambi Agrowon
ॲग्रो विशेष

Mosambi Management : शास्त्रीय व्यवस्थापनानेच मोसंबीमध्ये परिवर्तन शक्य

Mosambi Production : ‘मोसंबी बहार व्यवस्थापन व रोग व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. पाटील बोलत होते.

Team Agrowon

Jalna News : मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी बहार व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास मोसंबीमध्ये परिवर्तन शक्य आहे, असे मत धाराशिव येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना यांच्या वतीने ‘मोसंबी बहार व्यवस्थापन व रोग व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. पाटील बोलत होते. कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक तथा मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषीरत्न विजयअण्णा बोराडे अध्यक्षस्थानी होते. विकृती शास्त्रज्ञ डॉ. गजेंद्र जगताप, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, कीटकशास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

डॉ. पाटील म्हणाले, की मोसंबीचा चांगला बहर घेण्यासाठी रात्रीचे तापमान तीन आठवड्यांपर्यंत १४ अंश सेंटिग्रेट असेल तर मोसंबी बाग सुप्त अवस्थेत जाते व मोसंबीला चांगला बहार येऊन फुले मोठ्या प्रमाणात लागतात. मोसंबीच्या बागेला शिफारशीप्रमाणे सेंद्रिय खत व रासायनिक खत योग्य पद्धतीने द्यावे व संजीवकांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास मोसंबीची फळगळ होणार नाही व शाश्वत उत्पादन घेता येईल.

बोराडे म्हणाले, की मोसंबीच्या बहुतेक बागा भारी जमिनीत आहेत. यामुळे कृत्रिम पद्धतीने सब सोयलरचा वापर केल्यास भारी जमिनीत पाण्याचा निचरा होईल. शेतीमधील काडी कचऱ्याचे रूपांतर सेंद्रिय खतात रूपांतरित करून त्याचा वापर करणे गरजेचे आहे. तर जमिनीचे सर्व प्रश्न सुटतील व सेंद्रिय कर्ब वाढ होण्यास मदत होईल.

डॉ. एस. व्ही. सोनूने यांनी प्रास्ताविक केले. कृषी विज्ञान केंद्राने या वेळी फळगळीसंदर्भात केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष अजय मिटकरी यांनी मांडले. जालना जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांकडे पाच टक्क्यांपेक्षा कमी फळगळ व चांगले मोसंबीचे उत्पादन घेतले आहे,

अशा जालना तालुक्यातील ममदाबाद येथील शेतकरी सुनील मुंडे, अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील शेतकरी अंकुश घाटगे व घनसावंगी तालुक्यातील मानेपुरी येथील शेतकरी दत्ता वाघ यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. राहुल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT