Revenue Department Agrowon
ॲग्रो विशेष

Tehsil Officers Transfer: अहिल्यानगर जिल्ह्यातील दहा नायब तहसीलदारांच्या बदल्या

Revenue Department: दोन वर्षांपासून रखडलेल्या नायब तहसीलदारांच्या सोमवारी (ता.२) बदल्या करण्यात आल्या.

Team Agrowon

Ahilyanagar News: दोन वर्षांपासून रखडलेल्या नायब तहसीलदारांच्या सोमवारी (ता.२) बदल्या करण्यात आल्या. नाशिक विभागात ४४, तर जिल्ह्यात १० नायब तहसीलदारांच्या बदल्या झाल्या. एका नायब तहसीलदारास मुदतवाढ देण्यात आली आहे.जिल्हा निवडणूक शाखेतील नायब तहसीलदार प्रशांत गोसावी यांची नेवासे तहसील कार्यालयात निवडणूक शाखेत नायब तहसीलदार म्हणून बदली झाली. याच शाखेतील शंकर रोडे यांची सामान्य प्रशासन विभागात बदली झाली.

राहाता तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार एस. डी. ओहोळ यांना सेवानिवृत्तीपर्यंत याच पदावर मुदतवाढ देण्यात आली. श्रीगोंदे येथील निवडणूक नायब तहसीलदार पी. के. नेवसे यांची येवला येथे निवासी नायब तहसीलदार या पदावर बदली झाली. नेवासे येथील निवडणूक नायब तहसीलदार किशोर सानप यांची पाथर्डी येथे नायब तहसीलदार या पदावर बदली.

संगमनेर उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार एस. बी. लोमटे यांची शेवगाव येथे महसूल नायब तहसीलदार म्हणून शेवगाव येथे बदली झाली. संगमनेर येथील संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार आर. एम. राऊळ यांची श्रीरामपूरला निवासी नायब तहसीलदारपदी बदली झाली. अकोले येथील संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार एम. ए. माळवे यांची संगमनेर उपविभागीय कार्यालयात बदली झाली.

श्रीरामपूरचे निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांची निवडणूक शाखेत बदली झाली. पारनेरचे निवासी नायब तहसीलदार जी. आर. आढारी यांची संगमनेरला संजय गांधी योजनेत बदली झाली. चोपडा (जि.जळगाव) येथून सचिन किसन बांबडे यांची अकोले येथे संजय गांधी योजनेत नायब तहसीलदारपदी बदली झाली आहे. महसूल आणि वने विभागाचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी बदलीचा आदेश काढला आहे. सर्व बदली झालेल्या नायब तहसीलदारांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेशात नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Welfare: निघोज फलोद्यान सहकारी संस्थेचा कारभार शेतकरी हिताचा: प्रदीप वळसे

Kusum Solar Pump Complaints: कुसुम सौरपंपांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी; लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन

Panand Road Development: पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार करा; सुनेत्रा पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Fertilizer Dealers Protest: खत विक्रेत्यांचे आंदोलन बेकायदेशीर; कृषी विभागाची भूमिका

Krushimitra Recruitment Scam: कृषिमित्र भरती रॅकेट प्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT