Pharmaceutical Manufacturing Training Agrowon
ॲग्रो विशेष

Panchgavya Medicine : पंचगव्य औषधी, गोआधारित पदार्थ निर्मितीबाबत प्रशिक्षण

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुरस्कृत हे प्रशिक्षण येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था व आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्प (म्हैसपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले.

Team Agrowon

Akola Agriculture News : पंचगव्य औषधी (Panchgavya Medicine) व गोआधारित पदार्थाचे महत्त्व व त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणारी वाढ, आरोग्यमानात होणारी सुधारणा, फायद्यांबाबत देशभरातील वैज्ञानिकांनी येथे मार्गदर्शन केले.

विषजन्य औषधी व रासायनिक खताच्या अतिवापरामुळे होत असलेले मानवी आणि पशू आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सेंद्रिय शेती (Organic Farming) व पंचगव्य औषधीशिवाय पर्याय नाही यावरही एकमत झाले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुरस्कृत हे प्रशिक्षण येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था व आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्प (म्हैसपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले.

मार्गदर्शक म्हणून पशुकल्याण बोर्डाचे सदस्य सुनील मानसिंहका (नवीदिल्ली), महाराष्ट्र पशुवैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर, माफसूचे शिक्षण विस्तार संचालक प्रा. डॉ. अनिल भिकाणे उपस्थित होते.

अकोला येथील पंचकर्म विशेषज्ञ व आयुर्वेदाचार्य डॉ. राजेश भोंडे यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून गोरक्षा आणि आरोग्य संवर्धनाविषयी मार्गदर्शन केले. सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. दिघे, मुख्य प्रकल्प संशोधक व प्रमुख समन्वयक प्रा. डॉ. प्रशांत कपले, प्रा. डॉ. सतीश मनवर, प्रा. डॉ. चैतन्य पावसे, डॉ. मंगेश वडे, डॉ. अभय कुलकर्णी, मुकुंद गिरी, मंगेश कडू यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून सहभागी झालेल्या साडेतीनशेवर शेतकऱ्यांना पंचगंव्य प्रशिक्षण दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहसमन्वयक डॉ. दिलीप बदुकले, डॉ. सुनील हजारे, डॉ. कुलदीप देशपांडे, डॉ. मंगेश वडे, डॉ. मंगेश इंगवले, डॉ. काजल शिंदे व हेमंत अविनाशे, संतोष बानोकार, ज्ञानेश्वर साबे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. कपले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. इंगवले आणि डॉ. कुलदीप देशपांडे यांनी केले, तर आभार डॉ. बदुकले यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT