Cow and Buffalo Agrowon
ॲग्रो विशेष

Artificial Insemination Training : गाई-म्हशींच्या कृत्रिम रेतनासंबंधी प्रशिक्षण

Rashtriya Gokul Mission : केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय गोकूळ मिशनअंतर्गत मैत्री उपक्रमातून गाई-म्हशींच्या कृत्रिम रेतन आणि आनुषंगिक कामासाठी प्रशिक्षित तरुणांची नियुक्ती केली जाणार आहे.

Team Agrowon

Solapur News : केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय गोकूळ मिशनअंतर्गत मैत्री उपक्रमातून गाई-म्हशींच्या कृत्रिम रेतन आणि आनुषंगिक कामासाठी प्रशिक्षित तरुणांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यातून राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्याचा उद्देश आहे.

या उपक्रमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासह दूध उत्पादनातही वाढ होईल, असा सरकारचा उद्देश आहे.

हा प्रशिक्षण कार्यक्रम तीन महिने कालावधीचा आहे. यामध्ये एक महिना क्लासरूम ट्रेनिंग व दोन महिने प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा समावेश राहील. क्लासरूम ट्रेनिंग पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येईल.

प्रत्यक्ष प्रशिक्षण जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-एक किंवा तालुका लघू पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय या ठिकाणी  घेण्यात येईल. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जदार हा किमान बारावी उत्तीर्ण झालेला असावा. त्याचे वय १८ ते ३५ वर्ष असावे, अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध होईल. जिल्ह्याकरिता सर्वसाधारण प्रवर्गातून व अनुसूचित जाती प्रवर्गातून अशा एकूण ३५० उमेदवारांची निवड होईल.  इच्छुकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समितीकडे अर्ज सादर करावा, असे आवाहनही पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT