Sericulture Training Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture Training : पाळोदीत प्रौढ रेशीम कीटक संगोपनावर प्रशिक्षण

Agricultural Technology Management : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना व जिल्हा रेशीम कार्यालय यांच्यातर्फे मंगळवारी (ता.१९) पाळोदी (ता.मानवत) येथे प्रौढ रेशीम किटक संगोपन प्रशिक्षण व प्रात्यक्षिक घेण्यात आले.

Team Agrowon

Parbhani News : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना व जिल्हा रेशीम कार्यालय यांच्यातर्फे मंगळवारी (ता.१९) पाळोदी (ता.मानवत) येथे प्रौढ रेशीम किटक संगोपन प्रशिक्षणव प्रात्यक्षिक घेण्यात आले.

रेशीम उद्योजक शेतकरी देवराव टरपले यांच्या शेतावर आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आकाश लाटे होते. जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, मंडळ कृषी अधिकारी रघुवीरसिंह नाईक, एसबीआयचे सुनील हट्टेकर, धनंजय मोहोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मोहोड म्हणाले, ‘‘तुती लागवडीसाठी योग्य वाणाची निवड व रेशीम किटकांना उच्च प्रतिची पाने खाद्य देण्याची गरज आहे.’’ डॉ.लटपटे यांनी तुती रोपांची लागवड रेशीम कीटक संगोपनगृह निर्जंतुकीकरण, रेशीम किटकावरील रोग नियंत्रण व उझी माशी नियंत्रणासाठी निसोलायनेक्स थायमस या परोपजिवी किटकांचे महत्त्व सांगून एन. टी. पाऊच रेशीम संशोधन योजना येथे उपलब्ध असल्याचे सांगितले. हट्टेकर यांनी पीक कर्ज व सिल्क आणि मिल्कची माहिती दिली.

प्रास्ताविकात कदम यांनी रेशीम शेती संबधीत मनरेगा, पोकरा याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. सूत्रसंचालन केशव काकडे यांनी केले, तर आभार अभिजित देशमुख यांनी मानले. कांचन जाधव, जी.डब्ल्यू रनेर, पदमाकर टरपले, मोहन काकडे, मोहन कापसे आदींसह परिसरातील रेशीम उद्योजक शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT