Natural Farming Training Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Farming Training : तोंडापूर ‘केव्हीके’मध्ये कृषी सखींना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण

Tondapur KVK : हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील कृषी सखींसाठी नैसर्गिक शेती प्रशिक्षण घेण्यात आले.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्र व हैदराबाद येथील मॅनेज तसेच हिंगोली येथील उमेद फाउंडेशन यांच्यातर्फे सोमवारी (ता. ४) व मंगळवारी (ता. ५) हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील कृषी सखींसाठी नैसर्गिक शेती प्रशिक्षण घेण्यात आले.

प्रशिक्षणामध्ये नैसर्गिक शेतीच्या विविध विषयांवरती मार्गदर्शन व नैसर्गिक निविष्ठा निर्मिती प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. माजी खासदार अॅड. शिवाजी माने, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. शेळके, कृषिविद्या विशेषज्ञ राजेश भालेराव, उद्यानविद्या विशेषज्ञ अनिल ओळंबे, पीक संरक्षक विशेषज्ञ अजयकुमार सुगावे, गृहविज्ञान विशेषज्ञ रोहिणी शिंदे, कृषी विस्तार विशेषज्ञ डॉ. अतुल मो. मुराई, मृदाविज्ञान विशेषज्ञ साईनाथ खरात, पशुविज्ञान कार्यक्रम समन्वयक डॉ. कैलास गिते, विजय ठाकरे, शेतकरी दादाराव राऊत, ज्ञानेश्‍वर राऊत आदी उपस्थित होते.

अॅड. माने म्हणाले, की तापमान वाढ व वातावरणातील बदल याचा समन्वय साधून शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा. डॉ. शेळके म्हणाले, की ग्रामीण भागातील महिलांनी नैसर्गिक शेतीकडे व्यवसायिक दृष्टिकोनातून बघावे, मानवी आरोग्याचा समतोल राखावा.

भालेराव म्हणाले, की नैसर्गिक शेतीमध्ये पाणी व्यवस्थापन व पीक नियोजन, आणि बियाणे प्रक्रिया आणि पारंपरिक पद्धतीने बीज उत्पादन या बाबी महत्त्वाच्या आहेत. ओळंबे यांनी नैसर्गिक शेतीमध्ये भाजीपाला लागवड तंत्रज्ञानावर माहिती दिली.

सुगावे यांनी निमस्त्र, अग्निअस्त्र, ब्रह्मास्त्र अर्क, दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत व वापरण्याची पद्धती यावर तर शिंदे यांनी नैसर्गिक शेतीमध्ये न्यूट्रिशन गार्डन याचे महत्त्व आणि मानवी जीवनामध्ये सकस आहाराचे महत्त्व यावर माहिती दिली.

खरात यांनी सेंद्रिय कर्बाचे तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविले. डॉ. गिते म्हणाले, की नैसर्गिक शेतीमध्ये पशुधनाचे महत्त्व आहे. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील कृषी सखी सहभागी झाल्या होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT