Tusker Attack Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Tusker Attack Farmers : आजऱ्यात टस्कराचा ठिय्या; भुईमुग शेंग, गवताचे भारे विस्कटली, शेतकरी भयभीत

Ajara Tusker Attack : आजरा तालुक्यात टस्कराने कायमचा मुक्काम ठोकला आहे. एक तपाहून अधिक काळ तो तालुक्यात ठिय्या मारून आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Farmers : भुदरगड तालुक्यातील तांबाळे परिसरात गेलेला टस्कर मसोली परिसरातील चाळोबा जंगलात आला आहे. टस्कराने जंगलात परतल्याबरोबर या परिसरात धुडगूस घालण्यास सुरवात केली आहे.

मसोली गावातील तानाजी तेजम यांच्या ट्रॅक्टरचे टस्कराने नुकसान केले. तसेच शेतात रचलेली भुईमुगाच्या शेंगांची पोती व गवताचे भारे विस्कटून टाकले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आजरा तालुक्यात टस्कराने कायमचा मुक्काम ठोकला आहे. एक तपाहून अधिक काळ तो तालुक्यात ठिय्या मारून आहे. गेला महिनाभर टस्कर या परिसरातून भुदरगड तालुक्यातील तांबाळे परिसरात गेला होता. तेथे त्याने पिकांचे नुकसान केले. तो टस्कर परत चाळोबा जंगलात परतला आहे. त्याने मसोली गावात रस्त्यावर उभ्या केलेल्या तेजम यांच्या ट्रॅक्टरच्या इंजिनला धडक देऊन नुकसान केले.

यामध्ये सुमारे पंच्याहत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शेतात चंद्रकांत गुरव यांनी उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले आहे. त्यांनी शेतात भुईमुगाच्या शेंगांची पोती व गवताचे भारे रचून ठेवले होते. ही पोती व भारे टस्कराने विस्कटून टाकले. वनपाल बी. आर. निकम यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे.

चलाख टस्कर अन् हतबल शेतकरी

शेतातील भुईमुगाची पोती विस्कटल्याचे शेतकरी चंद्रकांत गुरव यांनी वनपाल बी. आर. निकम यांना कळविले. निकम यांनी पुन्हा नुकसान होऊ नये म्हणून भुईमुगाची पोती सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला गुरव यांना दिला. गुरव यांनी घरातील परड्यात पोती रचून ठेवली; पण तेथे जाऊन टस्कराने पोती विस्कटली. टस्कराचा चलाखपणा पाहून गुरव हतबल झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

Farmer Support: संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे : सावे

Chandwad Drought : चांदवडचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

SCROLL FOR NEXT