Tomato Rate agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Rate : टोमॅटो स्वस्त, पालेभाज्या महागल्या; कोल्हापूर सांगली बाजारपेठेतील जाणून घ्या स्थिती

Vegetables Market Rate : टोमॅटो स्वस्त, तर पालेभाज्या महागल्या आहेत. कोथिंबीरचा दर दहा रुपयास पेंढी असा झाला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Vegetables Rate : मागील आठवडाभरात टोमॅटो पन्नाशीपार होता. पावसाचा जोर कमी होताच आवक वाढली आणि वीस रुपयांवर किलोचा दर घसरला. तर कांदा, बटाटा चाळीस रुपये प्रतिकिलो दरावर स्थिर आहे. पालेभाज्यांची आवक घटल्याने दर वाढले आहेत. गवारीचा भाव शंभरीपार टिकून आहे.

गेल्या आठवड्यात पावसाचा जोर आणि पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक मार्गांवर वाहतूक बंद झाली होती. पालेभाज्यांसह टोमॅटोचीही आवक मंदावली. त्यामुळे दोन्हीचे दरही वाढणार असे चिन्ह दिसू लागले होते. मात्र, टोमॅटो स्वस्त, तर पालेभाज्या महागल्या आहेत. कोथिंबीरचा दर दहा रुपयास पेंढी असा झाला आहे. श्रावण घेवडा, गवारीचे दर स्थिर आहेत. आवकही कमी प्रमाणात आहे.

याशिवाय मुळा, वाटाणाच्या आवक अल्प प्रमाणात आहे. गेल्या आठवड्यात दहा रूपये प्रति पेंढी दर असणारी मेथीचा दर आज पंचवीस ते तीस रूपये असा होता. शेपू, पालक, कांदापात, पोकळा वीस रुपये प्रतिपेंढी असा दर वाढला. श्रावणाची सुरूवात आज, सोमवारपासून होणार असल्याने बाजारात पालेभाज्या, फळभाज्यांसह खास उपवासासाठी बटाटा, कोथिंबीर खरेदीकडे लोकांचा कल होता.

केळी, ड्रॅगनची आवक वाढली

श्रावण मासारंभ आणि पहिला सोमवार उपवासानिमित्त बाजारात जवारी, बंदरी केळीची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. जवारीचा दर ४० ते ८० रु. डझन, तर बंदरी केळी डझनास ४० ते ६० रुपये असा होता.

कोल्हापूरसह सांगली, सातारा परिसरात शेतकरी ड्रॅगन फ्रूट हे फळ पीक म्हणून मोठ्या प्रमाणात घेऊ लागले आहेत. परदेशी फळ स्थानिक शेतकरी उत्पादित करू लागल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. प्रति दीड किलो १०० रुपये असा दर आहे. हे फळ खरेदीकडेही ग्राहकांचा कल आहे.

फळभाज्यांचे किलोचे दर (रूपयांत)

वांगी ६०, दोडका ८०, ढब्बू मिरची ६० ते ७०, भेंडी ८०, हिरवी मिरची १००, बीनिस १८०, पापडी १००, काकडी ४०, कोबी २० ते ३५ रु. नग, फ्लॉवर ३० रु. नग, गवारी १०० ते १२०, दुधी भोपळा २० ते ४० रु. नग, बीट १० रु. नग, लिंबू दहा रुपयास सहा, कारली ६० रु. वरणा ४०, मुळा १० रु. नग.

उपवास स्पेशल प्रतिकिलोचे दर (रुपयांत)

शेंगदाणे १३० ते १५०, शाबू ७० ते ८०, वरी ११० ते १२०, राजिगरा १२०,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT