Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : वादळी वाऱ्यामुळे उडाले घरावरील टीनपत्रे

Rain Update : मंगळवारी (ता. २३) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान गारपिटीसह वादळी पाऊस झाला. यामध्ये शेकडो घरांवरील टीनपत्रे उडाले, तर दोन मजूर जखमी झाले.

Team Agrowon

Amravati News : चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी, विश्रोळी, घाटलाडकी, पुरणखेड, निमखेड येथे मंगळवारी (ता. २३) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान गारपिटीसह वादळी पाऊस झाला. यामध्ये शेकडो घरांवरील टीनपत्रे उडाले, तर दोन मजूर जखमी झाले.

ब्राह्मणवाडा थडी येथे मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान वादळी पावसाने धुमाकूळ घातला. यात ४०० ते ५०० घरांवरील काही, तर २० ते २५ घरांवरील पूर्ण टीनपत्रे उडाल्याचे समजते. यात बाहेर गावातील बांधकामासाठी आलेले दोन मजूर जखमी झाले.

याशिवाय ठिकठिकाणी झाडे कोसळली असून वीजतारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. झाडे पडल्याने शिरसगाव ते ब्राह्मणवाडी रस्ता काही वेळ बंद होता. तसेच विश्रोळी, घाटलाडकी या गावांना सुद्धा वादळी पावसाचा फटका बसला. तसेच गहू, कांदा, केळी, आंबा पिकांचे नुकसान झाले.

ब्राह्मणवाडा थडी, विश्रोळी, घाटलाडकी या गावांमध्ये वादळी पाऊस झाला. अनेकांच्या घरांवरील टीनपत्रे उडाले. यासंदर्भात तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत.
गीतांजली गरड, तहसीलदार, चांदूरबाजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Registration Fees Waived: शेतजमीन वाटणी आता पूर्णपणे होणार मोफत; नोंदणी फी रद्द करण्याचा सरकारचा निर्णय

khandesh Heatwave: खानदेशात उष्णता वाढली

Maharashtra Rain Alert: वादळीच पावसाची ४ दिवस शक्यता; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानासह पावसासाल पोषक वातावरण

Agriculture Advisory: बदलत्या हवामानात पिके जपा

Pragati Award: देवगिरकरांना ‘प्रगती’ पुरस्कार जाहीर; आज वितरण

SCROLL FOR NEXT