Tiger Agrowon
ॲग्रो विशेष

Tiger Terror : वाघाचा मुक्काम येडशीच्या जंगलात ; ट्रॅप कॅमेरात कैद

Tiger Attack : वैराग भागासह बार्शी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले आहे.

Team Agrowon

Solapur News : वैराग भागासह बार्शी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले आहे. या वाघाला पकडण्यासाठी पथकाने येडशीच्या जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेरात बुधवारी (ता. १५) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास अखेर वाघ आढळून आला आहे. त्यामुळे त्याला पकडण्याच्या मोहिमेने वेग घेतला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्‍वर संरक्षित वनातून वाघाचे धाराशिवमध्ये आगमन झाले होते. नंतर वाघ आलेल्या मार्गाने परत जाईल, असा अंदाज वनविभागाने बांधला होता. परंतु वाघ परत गेलाच नाही. वाघाने शिकारीची पद्धत बदलल्याने त्याला शोधण्यासाठी अडचण झाली.

वाघोबाला पकडण्यासाठी चंद्रपूर पथक प्रमुख डॉ. खोब्रागडे यांचेसह १० जणांचे पथक तसेच त्यांच्या बरोबर लातूरचे एक पथक त्यामध्ये ५ कर्मचारी, धाराशिवचे १० कर्मचारी, बार्शीचे १० कर्मचारी, सोलापूरचे ४ कर्मचारी, सांगोला २, मोहोळ २, अशी सुमारे ४५ जणांची टीम वाघाचा शोध घेत आहे. सुमारे २० किलोमीटर परिसरामध्ये वन विभागाचे कर्मचारी पायी प्रवास करत त्याचा शोध घेत आहेत.

वाघांनी वैराग भागामध्ये लाडोळे, राळेरास, सासुरे आदी भागांमध्ये प्राण्यांची शिकार केली. त्यानंतर वाघाने परतीचा प्रवास सुरू केला. त्याने शेवटची शिकार लाडोळे शिवारातील एका गाईची केली.

शिकारीनंतर वाघ जामगाव (पा) या मार्गाने कारी, नारीच्या दिशेने बालाघाटच्या डोंगराकडे गेला, मात्र वाघाने शिकार केली नसल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्याचा पत्ता लागेना. शक्यतो वाघ एखाद्या प्राण्याची शिकार केल्यानंतर सुरुवातीला त्याचे रक्त प्राशन करतो.

नंतर शरीराचा अधिक मांसल भाग खातो. यानंतर शिकार केलेला प्राणी तसाच टाकून २४ तासांच्या आत परत येऊन उर्वरित भागाचे भक्षण करतो, त्यामुळे त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

वाघ पकडण्याचा अनुभव

पथक प्रमुख डॉ. खोब्रागडे यांना व त्यांच्या पथकातील काही सदस्यांना ८४ वाघ पकडण्याचा अनुभव आहे. ताडोबा अभयारण्यातील वाघ अन्य ठिकाणी गेल्यावर तसेच राज्यात अन्य ठिकाणी त्यांनी वाघांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले. पथकात निष्णात अधिकारी व कर्मचारी असून त्यांनी डार्ट गन, जाळी, इलेक्ट्रिक स्टिक, टेंट, टॉर्च आदी साहित्य सोबत आणले आहे.

शारीरिक रचना पाहून निर्णय

वाघाला नेमके कसे पकडायचे, याचा निर्णय वाघाचे वय, नखे, अंदाजे लांबीचा विचार करण्यात येतो. त्यानंतर डार्ट गन वापरून बेशुद्ध करणे, जाळी लावून फसवण्याचा प्रयत्न करणे, पिंजऱ्यात अन्य प्राणी ठेवून अडकवणे, अन्य प्रकारचे सापळे लावणे आदींपैकी कोणता पर्याय वापरायचा हे ठरवण्यात येणार आहे. पूर्वीचे कॅमेऱ्याचे फुटेजही तपासले जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT