Tiger Terror  Agrowon
ॲग्रो विशेष

Tiger Sighting : उक्कडगाव परिसरात वाघ दिसल्याचा दावा, वन विभाग सतर्क

Tiger Terror : गेल्या पाच दिवसांपासून अभयारण्यात न दिसलेला वाघ आज (ता. २०) दुपारी एकच्या सुमारास उक्कडगाव (ता. बार्शी) शिवारात दिसल्याचा दावा शेतकरी मिठू वाघमारे यांनी केला आहे.

Team Agrowon

Solapur News : गेल्या पाच दिवसांपासून अभयारण्यात न दिसलेला वाघ आज (ता. २०) दुपारी एकच्या सुमारास उक्कडगाव (ता. बार्शी) शिवारात दिसल्याचा दावा शेतकरी मिठू वाघमारे यांनी केला आहे.

बऱ्याच दिवसानंतर पुन्हा उक्कडगाव शिवारात वाघाचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मिठू वाघमारे व अन्य चार महिला गव्हाची कापणी करत असताना, त्यांना अंदाजे २०० फूट अंतरावरून वाघ जात असल्याचे दिसले. वाघमारे यांनी सोबतच्या महिलांना याबाबत माहिती दिली. मात्र, तोपर्यंत वाघ नदीच्या कडेला असलेल्या दाट झाडीत गायब झाला.

वाघ येडेश्वरी मंदिराच्या दिशेने आला असून, पुढे नदीच्या कडेला जाऊन दिसेनासा झाल्याचे सांगितले.विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच (ता. १६) मिठू वाघमारे यांच्या गोठ्यातील वासरांवर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते.

ही घटना ताजी असतानाच आज वाघाचे दर्शन झाल्याने स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी उक्कडगाव शिवारात वाघाने एकाच वेळी तीन जनावरांवर हल्ला करून ठार केले होते.वनविभागाने तातडीने दखल घेऊन या वाघाचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT