Unseasonal Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : विजांच्या कडकडाटासह काही भागांत पावसाच्या सरी

Rain News : जिल्ह्याच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून घट झाली होती. त्यामुळे उष्णतेच्या झळांची तीव्रता मागील काही दिवसांच्या तुलनेत कमी झाली होती.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्याच्या अनेक भागांत मंगळवारी (ता. २५) सायकांळी वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दोडामार्ग तालुक्याच्या काही भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे या भागातील काजू पिकांचे पुन्हा नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिल्यामुळे आंबा, काजू बागायतदारांची धास्ती वाढली आहे.

जिल्ह्याच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून घट झाली होती. त्यामुळे उष्णतेच्या झळांची तीव्रता मागील काही दिवसांच्या तुलनेत कमी झाली होती. परंतु मंगळवारी दुपारी अडीच तीन वाजल्यापासून वातावरणात अचानक बदल जाणवायला सुरुवात झाली.

ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने वातावरणात प्रचंड उकाडा वाढला. उन्हांच्या झळांनी अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दरम्यान, चार वाजण्याच्या सुमारास घाटपायथ्याच्या गावांमध्ये विजांच्या गडगडाट सुरू झाला. त्यानंतर काही गावांमध्ये पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळल्या.

वैभववाडी तालुक्यातील नावळे, सडुरे, कुर्ली, या गावांमध्ये पावसाच्या सरी झाल्या. त्यानतंर दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. या तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. सायकांळी उशिरापर्यंत काही भागात कडकडाट आणि वादळीवारे सुरू होते.

दरम्यान, या पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह काही भागांत पावसाचा अंदाज दिला आहे. या वर्षी वातावरणातील बदलाचा मोठा फटका आंबा, काजू उत्पादनावर झाला आहे. त्यातच आता पावसाचा अंदाज दिल्यामुळे आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढणार आहे.

 वाऱ्याचा वेग वाढला

जिल्ह्यात सर्वत्र मंगळवारी सायकांळी पावसाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर अनेक भागात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहत होते. सावंतवाडी परिसरात गार वारे वाहत होते. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचे वातावरण होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT