Tiger Terror  Agrowon
ॲग्रो विशेष

Tiger Terror : बार्शी परिसरातून निघालेल्या वाघाचे भूममधील सुटका परिसरात दर्शन

Tiger Attack : बार्शीसह येडशी भागातून निघालेल्या वाघाचे भूम तालुक्यातील सुटका गावच्या परिसरातील तलावाजवळील रस्त्यावर परवा मध्यरात्री दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Team Agrowon

Solapur News : बार्शीसह येडशी भागातून निघालेल्या वाघाचे भूम तालुक्यातील सुटका गावच्या परिसरातील तलावाजवळील रस्त्यावर परवा मध्यरात्री दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने पडताळणी केली, तेव्हा वाघाच्या पायाचे ठसे आणि हालचाली दिसून आल्या आहेत.

उक्कडगाव (ता.बार्शी) परिसरात (ता.17) तीन जनावरांवर हल्ला करून वाघ सोलापूर जिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यातील कडकनाथवाडी, वडजी, सुटका असा प्रवास करत परतीच्या वाटेला लागला की काय, की तो आपली हद्द वाढवीत तर चालला नाही ना, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.

वडजी (ता.भूम) येथे वासरावर हल्ला केल्यानंतर तब्बल चार दिवसानंतर बुधवारी (ता.२३) रात्री एक वाजता सुटका परिसरातील तलावाजवळ एका नागरिकाने वाघ रस्त्यावरून जाताना पाहिला. काही वेळ वाघ रस्त्यावर थांबल्यानंतर तो तलावाच्या दिशेने निघून गेला. तो वाघ तलाव परिसरात वावरत होता आणि त्याच्या हालचालीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाघाच्या दर्शनाबाबत माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तलावाजवळ आणि शेजारील शेतांमध्ये वाघाचे ठसे तपासून पाहिले. या ठशांच्या आधारे तो वाघच असल्याची खात्री वन विभागाने केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाघाला पकडण्यासाठी शासनाने विशेष रेस्क्यू पथक तैनात केले आहे. ते वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कामासाठी सापळे, ड्रोन आणि अन्य तांत्रिक उपकरणांचा वापर केला जात आहे.

वाघाला जेरबंद करण्यासाठी विशेष रेस्क्यू पथक काम करत आहे. परंतु अद्याप वाघाला पकडण्यात यश आलेले नाही. कालच्या घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन अधिक तीव्र करण्यात आले आहे. नागरिकांनी संयम ठेवावा आणि स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.
- डी. एस. गांधले, भूम वनपरिक्षेत्र अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT