Bullock Cart  Agrowon
ॲग्रो विशेष

Bullock Cart Race : कोरवलीत बैलगाडा शर्यतीचा थरार

Bullock Cart : मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील ह.भ.प. श्री. संत माणकोजी बुवा बोधले महाराज यात्रेनिमित्त शिवबसव युवा प्रतिष्ठानतर्फे सोमवारी (ता. २७) आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार या भागात पहिल्यांदाच पाहायला मिळाला.

Team Agrowon

Solapur News : मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील ह.भ.प. श्री. संत माणकोजी बुवा बोधले महाराज यात्रेनिमित्त शिवबसव युवा प्रतिष्ठानतर्फे सोमवारी (ता. २७) आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार या भागात पहिल्यांदाच पाहायला मिळाला.

ह.भ.प. संजीवकुमार राजमाने महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या शर्यतीला सुरवात करण्यात आली. या शर्यतीत सांगोला, मंगळवेढा तसेच मोहोळ तालुक्यांतील अनेक शेतकरी हे आपल्या बैलजोडीसह आले होते.

दरम्यान, प्रतिष्ठानच्या वतीने आकर्षक रोख बक्षीस वसन्मान चिन्ह ठेवण्यात आले होते. बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर एवढ्या प्रमाणात पहिल्यांदाच कोरवलीच्या या भागात बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला.

...यांनी मारली बाजी

या शर्यतीत सर्वसाधारण गटात प्रथम क्रमांक वसंत गरंडे (नंदेश्वर, ता. मंगळवेढा), द्वितीय क्रमांक दत्ता चोपडे (हुन्नुर, ता. मंगळवेढा), तर तृतीय क्रमांक बंडू स्वामी (कोरवली) व विठ्ठल खरात (घेरडी) यांना देण्यात आले.

तसेच आदत खोंड प्रथम क्रमांक, अशोक दोलतडे (घेरडी, ता. सांगोला) तर द्वितीय क्रमांक विभागून नामदेव चोरमोले (घेरडी, ता. सांगोला) आणि केशव शेळके (हराळवाडी) यांना देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT