Dryland Area Development Fund  Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Fund : ग्रामपंचायतींच्या निधीत तीनपट वाढ

Rural Development : काँग्रेस सरकारच्या काळात ग्रामपंचायतींना अल्पनिधी दिला जायचा; मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्यांनी ग्रामपंचायतींना तीनपट निधी वाढवून दिल्याचे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी वाडा येथे म्हटले.

Team Agrowon

बाळासाहेब पाटील

Wada News : काँग्रेस सरकारच्या काळात ग्रामपंचायतींना अल्पनिधी दिला जायचा; मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि त्यांनी ग्रामपंचायतींना तीनपट निधी वाढवून दिल्याचे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी वाडा येथे म्हटले.

वाडा पंचायत समितीच्या वतीने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत ३२ ग्रामपंचायत कार्यालये मंजूर झाली आहेत. त्यांचा भूमिपूजन सोहळा पटारे मंगल कार्यालयात कपिल पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. त्यावेळी बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले की, १० व्या वित्त आयोगात ८ हजार कोटी वित्त आयोगाचा बजेट होता. ११ व्या वित्त आयोगात २० हजार कोटी, १२ व्या वित्त आयोगात ३० हजार कोटी, १३ व्या वित्त आयोगात ५८ हजार कोटी तर त्यानंतर देशात परिवर्तन झाले.

१४ व्या वित्त आयोगात २ लाख २९ हजार तर १५ व्या वित्त आयोगात २ लाख ३६ हजार कोटींचा असा तीन पट वाढीचा भरीव निधी सरपंचाच्या हातात दिला असल्याचे त्यांनी म्हटले.

पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा आढावा घेतला. यावेळी ग्रामपंचायत इमारत बांधकामाचे मंजुरी आदेश पत्र सरपंचाना पाटील यांच्या हस्ते दिले.

कार्यक्रमाला आमदार शांताराम मोरे, संदेश ढोणे, रोहीणी शेलार, संदीप पावडे, मिताली बागुल, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आदी मान्यवरांसह विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी सरपंच, सदस्य उपस्थित होते.

३२ ग्रामपंचायतींसाठी कार्यालये मंजूर

वाडा पंचायत समितीच्या वतीने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत ३२ ग्रामपंचायत कार्यालये मंजूर झाली आहेत. या ग्रामपंचायतीच्या इमारतीचे भूमीपूजन कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयांसाठी निधी मंजूर झाला आहे. त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना बांधकामाच्या मंजुरीचे आदेश पत्र कपिल पाटील यांच्या हस्ते दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Recognition: महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांची माहिती

Pimpalgaon Baswant APMC: पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो खरेदीतील दरतफावतीला लगाम

Rain Deficit : नऊ महसूल मंडलांत २१ दिवसांचा पावसाचा खंड

Agricultural Drought : शेतशिवाराला दुष्काळाच्या झळा

Maharashtra Agriculture : परभणी जिल्ह्यात शुक्रवारपासून केवळ ‘एफएफएस’ ॲपद्वारे खत विक्री

SCROLL FOR NEXT