Election Agrowon
ॲग्रो विशेष

Voter List : अहिल्यानगरमध्ये पाच वर्षांत वाढले पावणेतीन लाख मतदार

Team Agrowon

Ahilyanagar News : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता रणधुमाळीला वेग येऊ लागला आहे. यंदा विधानसभेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात बारा विधानसभा मतदार संघात ३७ लाख सत्तर हजार ९८ मतदार असून त्यात १९ लाख ३६ हजार ९०० पुरुष व १८ लाख २३ हजार ४११ पुरुष मतदार आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर पाच वर्षांत जिल्ह्यात सुमारे २ लाख ९६ हजार ७५५ मतदार वाढले आहे. जिल्ह्यात बारा विधानसभा मतदार संघ असून विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रशासनाकडून मतदार संख्या जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदा (२०२४) विधानसभेसाठी १९ लाख ३६ हजार ९०० पुरुष व १८ लाख २३ हजार ४११ पुरुष मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पावने चार लाख मतदार आहेत. त्यापाठोपाठ पारनेर, कर्जत-जामखेडमध्ये साडेतीन लाख, श्रीगोंद्यात तीन लाख सदोतीस हजार, राहुरीत सव्वातीन लाख मतदार आहेत. अकोल्यात सर्वात कमी मतदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ३४ लाख ७३ हजार ७४३ मतदार होते.

पाच वर्षात अकोल्यात ११ हजार ९२५, संगमनेरला १७ हजार ५३८, शिर्डीत २८ हजार १०४, कोपरगावात २३ हजार ६०९, श्रीरामपूरला २० हजार ४२८, नेवाशाला १८ हजार १२६, शेवगाव-पाथर्डीला ३१ हजार ६१६, राहुरीला २९ हजार ६१६, पारनेरला २८ हजार ७२५, अहिल्यानगर शहरात २४ हजार ९५०, श्रीगोंद्याला २७ हजार ०३८, आणि कर्जत-जामखेडला २५ हजार १२५ नवीन मतदार वाढले आहे. मतदार आणि निवडणुकींच्या रिंगणात राहणारे उमेदवार या बाबत विचारमंथन करताना जातिनिहाय मतदारांचे गणित मांडूनच उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

निवडणूक खर्चाची मर्यादा चाळीस लाख

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला १० हजार व राखीव मतदार संघातील उमेदवारांना ५ हजार रुपये अनामत रक्कम आहे. निवडणूक काळात प्रचार व अन्य बाबीसाठी एकूण ४० लाख खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

त्याचा दैनंदिन हिशेब उमेदवारांना द्यावा लागणार आहे. कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी होत असताना चाळीस लाखात निवडणूक होईल का? खरंच खर्चाची मर्यादा पाळली जात असेल, की केवळ मर्यादेचा फार्स आहे याची लोकांत चर्चा केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement : शिराढोणला सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू होणार

Crop Damage : ‘ओझरखेड’च्या आवर्तनाने पिके पाण्याखाली

Crop Damage : पावसामुळे सोयाबीनसह तुरीचे पीक पाण्यात

Soil Erosion : जमिनीची धूप थांबविली तरच भविष्यात शाश्‍वत उत्पादन

Soybean Harvesting : सोयाबीन कापणीला एकरी सहा हजारांचा खर्च

SCROLL FOR NEXT