Mango and Cashew Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Cashew Insurance : तीनशे आंबा-काजू बागायदार विमा परताव्यापासून वंचित

Fruit Crop Insurance : गेल्या वर्षी प्रतिकूल हवामान, अवकाळी पाऊस यामुळे बागायतदारांना चांगलाच फटका बसलेला आहे.

Team Agrowon

Rajapur News : प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसामुळे गत वर्षी नुकसान झालेल्या तालुक्यातील भू-खिणगिणी-कोतापूर-पेंडखळे परिसरातील ३०० आंबा-काजू बागायदारांना विमा परतावाच मिळालेला नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील बागायतदारांनी दर वर्षीप्रमाणे २०२३-२०२४ या कालावधीत शासनाच्या पीकविमा योजनेत आंबा-काजू बागांचा विमा उतरवलेला होता. गेल्या वर्षी प्रतिकूल हवामान, अवकाळी पाऊस यामुळे बागायतदारांना चांगलाच फटका बसलेला आहे. गेल्या काही वर्षामध्ये अशी परिस्थिती सतत निर्माण होत आहे.

त्यामुळे बागायदारांचा खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसवलेला नाही. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षणाच्या लाभाचा आधार असतो. यंदा तोही मिळालेला नाही. भूमंडळ पूर्वीपासून गोवळ किंवा राजापूर मंडळाशी जोडलेले होते.

भूमंडळाजवळ असलेले हवामान मापक केंद्र ओणी व गोवळ हे केंद्र सोडून कृषी विभागाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता लांजा तालुक्यातील हर्चे या हवामानमापक केंद्राला जोडलेले आहे. त्यामुळे हा गोंधळ झाला असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे मत आहे.

शासन निकषानुसार पीक विम्याचा हप्ता भरलेला आहे. त्यामुळे महसुली निकषानुसार नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याबाबत भू विविध सेवा सोसायटीचे चेअरमन मनोज कदम म्हणाले, ‘‘भू परिसराचे मंडल राजापूर तालुक्यात असले तरीही हा परिसर लांजा तालुक्यातील हर्चे-साटवली येथील हवामानमापक केंद्राशी जोडला गेलेला आहे.

त्यामुळे नुकसान भरपाई मिळालेली नाही. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनपद्धत आणि धोरणाचा शेतकरी, बागायतदारांना फटका बसला आहे. याबाबतची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT