Rabi Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Irrigation : निम्म मानारमधून रब्बीसाठी तीन पाणी पाळ्या

Agriculture Irrigation : रब्बी हंगामासाठी पहिली पाणीपाळी २५ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यातील निम्न मानार प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्यासाठीचे पाणी राखीव ठेवून रब्बी हंगाम २०२३ साठी तीन पाणीपाळया देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रब्बी हंगामासाठी पहिली पाणीपाळी २५ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व बागायतदारांनी पाटबंधारे शाखेत रितसर पाणी अर्ज देऊन पाणीपट्टी भरून सिंचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

निम्न मानार प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांनी रब्बी हंगामी, दुहंगामी तसेच हंगामातील इतर उभी पिके या पिकासाठी कालव्याचे प्रवाही, कालव्यातील उपसा, नदीनाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना नंबर ७, व ७(अ) ७(ब) मध्ये पाणी अर्ज सादर करावेत.

सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहित नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाळी २५ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू करण्यात येणार आहे.

निम्न मानार प्रकल्प गोदावरी शाखा कालवा क्र. १, कालवा क्र. २ व डावा कालवा, उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचनालयाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल.

पाऊस व आकस्मिक कारणांमुळे पाणीपाळी संख्या, कालावधी व तारखांमध्ये बदल होऊ शकतो. तरी प्रकल्प क्षेत्रातील सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता आ. शि. चौगुले यांनी केले आहे.

पाणीपाळीचे प्रस्तावित नियोजन

आवर्तन क्र. १ चा कालावधी २५ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर २०२३ पर्यत आहे. आवर्तन क्र. २ चा कालावधी ३० डिसेंबर ते १३ जानेवारी २०२४ असून आवर्तन क्र. ३ चा कालावधी २९ जानेवारी २०२४ ते १३ फेब्रुवारी २०२४ असा प्रस्तावित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : मॉन्सूनचा वेगवान प्रवास; मुंबई गाठली, विदर्भात वर्ध्यापर्यंत मजल

Livestock Fodder Management: कमी पावसाच्या परिस्थितीत शाश्‍वत चारा व्यवस्थापन

Kharif Sowing 2026 : देशात कापूस, सोयाबीन, ऊस, भात लागवड पिछाडीवर; भरडधान्य, तूर, मक्याची आघाडी

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तयारी सुरु

Khoya Production Mechanization: खवा उत्पादनातील यांत्रिकीकरण

SCROLL FOR NEXT