Pune News : हवामान विभागाने चालू वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. एक जूनपासून ते २९ ऑक्टोबर अशा पाच महिन्यांच्या कालावधीत मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर सर्वाधिक ७ हजार १७४ मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या वर्षी पाच महिन्यांच्या कालावधीत ५ हजार ८५१ मिलिमीटर पाऊस पडला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी एक हजार ३२३ मिलिमीटरने अधिक पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे.
यंदा पावसाळ्यात जूनपासून चांगला पाऊस पडण्यास सुरुवात झाली. मात्र, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या काळात मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल सात हजार १७४ मिलिमीटर पाऊस पडला होता. इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याची चांगलीच आवक झाली. त्यामुळे यंदा पावसाळ्यात धरणांत तब्बल ६०१.०५ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. २६ धरणांत आवक झालेल्या साठ्यापैकी २०१.०१ टीएमसी उपयुक्त पाण्याचा साठा करण्यात आला असून उर्वरित पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
चालू वर्षी पुणे जिल्ह्यात सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाला आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने चांगलाच मुसळधार पाऊस कोसळ्याने धरणांतील पाण्याची पातळी वेगाने वाढली. त्यातच नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत असल्याने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसला. त्यातच परतीच्या व मॉन्सूनोत्तर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली असून थंडीस सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील धरणांत पाण्याची आवक कमी होत असल्याने अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आहे.
गेल्या वर्षी पाच महिन्यांच्या काळात मुळशीच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर पाच हजार ८५१ मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यापाठोपाठ टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ४ हजार २६५ मिलिमीटर पाऊस पडला. तर गेल्या वर्षी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २ हजार ५९० मिलिमीटर पाऊस पडला होता. तर शेटफळ, नाझरे, वीर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, चिल्हेवाडी, घोड, विसापूर, उजनी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात एक हजार मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडला आहे. विसापूर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वांत कमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस पडला
यंदा झालेल्या पावसामुळे लोणावळ्याच्या घाटमाथ्यावर ५ हजार ५५५ मिलिमीटर पाऊस पडला. तर वळवण ५ हजार २८ मिलिमीटर, कुंडली ३ हजार ९३४, शिरोटा ३ हजार ८८८ मिलिमीटर, ठोकरवाडी ३ हजार १८१ मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या वर्षी याच घाटमाथ्यावर कमी पाऊस पडला होता. यामध्ये लोणावळा ४ हजार मिलिमीटर, वळवण ५०२८, ठोकरवाडी ३ हजार ६६, शिरोटा २ हजार ७७१, कुंडली २ हजार ९२६ मिलिमीटर पाऊस पडला होता.
सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस झाल्याची झाली नोंद
चार महिने धो धो पडला पाऊस
मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्यात वेगाने झाली वाढ
भामा आसखेड १२९९ ८१३
आंध्रा १५८९ १०३९
वडीवळे २८२० २७२२
शेटफळ ८७४ ६५१
नाझरे ९६९ ३६१
गुंजवणी २६३९ १८५९
भाटघर ११२१ ७९८
निरा देवघर २७२० २०१४
वीर ६५३ २१८
पिंपळगाव जोगे ८९० ७२५
माणिकडोह ८२७ ७२१
येडगाव ७७१ ३९८
वडज ६८१ ४९५
डिंभे १३२५ ७५२
चिल्हेवाडी ८८६ ६२२
घोड ६३२ ४४०
विसापूर २४४ २१७
उजनी ५९५ ४२७
मुळशी ७१७४ ५८५१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.