Jaggery Rate agrowon
ॲग्रो विशेष

Jaggery Rate : यंदाच्या हंगामात गुळाला विक्रमी दर, क्विंटलला ११ हजारांचा सौदा

Kolhapur Jaggery Rate : गुळाला विक्रमी प्रती क्विंटल ११ हजार रुपये दर मिळाला. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत सौदे पार पडले.

sandeep Shirguppe

Kolhapur Market Yard : दीपावली- पाडव्याच्या मुहूर्तावर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत काढलेल्या सौद्यात यावर्षीच्या हंगामातील नव्या गुळाला विक्रमी प्रती क्विंटल ११ हजार रुपये दर मिळाला. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

बाजार समितीत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच गूळ हंगाम सुरू झाला आहे. सुरुवातीला चांगल्या गुळाला प्रती क्विंटल ३५०० ते ४ हजार रुपये दर मिळत होता; पण गुळाची आवक वाढल्याने या दरात चढ-उतार सुरू होते.

साखर कारखान्यांच्या हंगामासोबतही काही गुऱ्हाळघरे सुरू होती. या नव्या गुळाचा सौदा मंत्री मुश्रीफ, आमदार पाटील, बाजार समिती सभापती भारत पाटील, माजी आमदार संजय घाटगे यांच्या उपस्थितीत काढण्यात आला.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात ५० गुर्‍हाळे सुरू झाली आहेत. तर पुढच्या काही दिवसात आणखी ५० गुऱ्हाळे सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे यावर्षी ३०० ते ४०० गुर्‍हाळे सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर गुळाच्या दरातही तेजी आल्याने शेतकरी गुऱ्हाळ घरांना ऊस घालण्याकडे कल देत आहेत.

मागच्या चार दिवसांत कोल्हापूर जिल्हा बाजार समितीत २१ हजार गूळ रव्यांची, तर ५ हजार बॉक्सची आवक झाली. यामध्ये ३ हजार ८०० पासून ते ५ हजार १०० रुपयांपर्यंत गुळाला क्विंटलमागे दर मिळाला. यामध्ये एकाच दिवशी ८० टक्के गुळाची विक्री झाली.

तर शुक्रवारी (ता.२७) २८ हजार रवे व ७ हजार बॉक्सची आवक झाली, त्याचा दर सरासरी ४ हजार ९०० रुपये मिळाला तर (ता.२८) ३० हजार रवे आणि ९ हजार बॉक्सची आवक झाली. यावेळी यंदाचा उच्चांकी दर ५ हजार १०० रुपये झाला. या प्रमाणात दररोज गुळाची आवक होत आहे. अडत दुकानात गूळ शिल्लक राहत नसल्याने गुळाला चांगली मागणी असल्याचे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT