Chana Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Sowing : हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार

Chana Production : यंदा ओलावा चांगला आहे. तसेच पाऊसमान चांगले राहिल्याने जलसाठे बऱ्यापैकी आहेत. यामुळे पेरणीवर परिणाम होणार नाही, अशी माहिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात हरभऱ्याची पेरणी यंदा ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. क्षेत्र यंदा सुमारे १० हजार हेक्टरने वाढून सव्वा दोन लाख हेक्टरवर पेरणी होईल, अशी माहिती आहे. यंदा ओलावा चांगला आहे. तसेच पाऊसमान चांगले राहिल्याने जलसाठे बऱ्यापैकी आहेत. यामुळे पेरणीवर परिणाम होणार नाही, अशी माहिती आहे.

पेरणीत मोठी वाढही होणार नाही. कारण सर्वच शेतकऱ्यांकडे मुबलक जलसाठे नाहीत. अनेकांनी मका, ज्वारी ऐवजी हरभऱ्याच्या पेरणीचे नियोजन केले आहे. खानदेशात मागील तीन वर्षे रब्बीची चार लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात फक्त मागील हंगामात पेरणी कमी पावसाने घटली होती.

परंतु मागील वेळेसही हरभऱ्याची सर्वाधिक एक लाख ९० हजार हेक्टरवर पेरणी झाली हरोती. यंदा मात्र पेरणीत आणखी काहीशी वाढ होईल, असे मानले जात आहे. पाणी मुबलक असले तरी यंदा हरभऱ्याचे क्षेत्र फारसे वाढणार नाही, असाही अंदाज आहे. कारण अनेक शेतकरी परंपरेनुसार हरभरा पेरणीचे नियोजन करतात.

हरभरा कमी खर्च व कमी पाण्यात येणारे पीक आहे. यंदा पेरणीत किंचित किंवा १० ते १२ हजार हेक्टरने वाढ होईल, असे सध्या दिसत आहे. काही शेतकरी पुढे काबुली किंवा डॉलर (मॅक्सिको) हरभऱ्याची पेरणी करतील. यामुळे क्षेत्रात पुढे वाढही दिसू शकते. ही पेरणी धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल भागांत होईल. ती तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर होईल, असे सांगितले जात आहे.

कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी यंदा बऱ्यापैकी असणाार आहे. ही पेरणी करण्यासाठी अनेकांना वेळ आहे. ओलावाही आहे. सोयाबीनचे पीक आल्यानंतर त्यात हरभरा पेरणी करता येईल. या कालावधीतही ओलावा राहणार आहे. पूर्वमशागत करताना वेळ लागणार आहे, पण त्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. काही कोरडवाहू शेतीधारकांनी नजीकच्या शेतकऱ्यांकडून पाणी घेण्याचे नियोजनही केले आहे. एक वेळेस सिंचन केल्यास पीक जोमात येते, असे शेतकरी मानतात.

या भागांत पसंती

हरभरा पेरणीस खानदेशात जळगावमधील रावेर, यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागांतील शेतकरी पसंती देतात. मका पीक खर्चिक बनले आहे. त्यास पाणी व फवारण्या अधिक लागतात. तसेच अमेरिकन लष्करी अळीचेही संकट असते. यामुळे अनेकांनी मका पिकाऐवजी हरभऱ्याची पेरणी करण्याचे नियोजन केले आहे. तसेच खानदेशात केळी, पपई आदी पिकांसाठी हरभरा पिकांचे बेवड चांगले मानले जाते.

यातूनही अनेकांनी जमिनीचा पोत, सुपीकता आदी बाबी लक्षात घेऊन हरभरा पेरणीचे नियोजन केले आहे. काबुली हरभऱ्याची पेरणी खानदेशात सुमारे ३० हजार हेक्टरवर होणार आहे. यात मोठा काबुली किंवा डॉलर हरभऱ्याची पेरणी सुमारे ११ हजार हेक्टरवर होण्याचा अंदाज आहे. हरभरा पीक तापी, गिरणा, अनेर, पांझरा आदी नद्यांच्या क्षेत्राचे पारंपरिक पीक आहे. याच भागात पेरणी अधिक असणार आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

Shetkari Karjmafi : शेतकऱ्यांची कर्जमाफी पहिल्या कॅबिनेटमध्येच जाहीर करा; राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची मागणी

Sugarcane Season 2024 : कृष्णा कारखान्याचे १५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Rabi Season 2024 : सिंधुदुर्गात रब्बी हंगामाला प्रारंभ; मशागतीला वेग

Rabi Season 2024 : सातारा जिल्ह्यात रब्‍बी पिकांच्या पेरणीस वेग

SCROLL FOR NEXT