Radhakrishna Vikhe Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Radhakrishna Vikhe Patil : दूध खरेदीबाबत हमीदर कायदा झाला पाहिजे : मंत्री विखे

Milk Rate and Subsidy : दुधाला किमान ३० रुपये दर आणि पाच रुपये अनुदान देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे.

Team Agrowon

Nagar News : दुधाला किमान ३० रुपये दर आणि पाच रुपये अनुदान देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. दूध खरेदीबाबत हमीदर कायदा झाला पाहिजे हे सरकारलाही वाटते, असे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

गणोरे तालुका अकोले येथे शुभम आंबरे व संदीप दराडे हे दूध दराच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून बेमुदत उपोषण करत होते. सात दिवसानंतरही या उपोषणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरात संताप व्यक्त झाला होता.

रविवारी (ता. ७) या उपोषणाला दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन मागणी ऐकून घेतल्या. त्यानंतर दिलेल्या आश्वासनावर उपोषण मागे घेण्यात आले. त्यानंतर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की दुधाचे मागणीपेक्षा उत्पादन अधिक आहे.

इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात आता बऱ्यापैकी दर मिळत आहे. दुधाला किमान ३० रुपये प्रति लिटर दर मिळणार आहे. मात्र दुधाला हमी दर मिळावा आणि त्या संदर्भात कायदा करण्यात यावा अशी केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे.

दूध दराच्या संदर्भात सरकार सकारात्मक असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

Cotton Market Price: कापूस दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबुजाचे आजचे बाजारभाव

Crop Damage Survey: आंबा, काजू नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू

SCROLL FOR NEXT