Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Rain : सोलापूरात कधी ढगाळ, कधी ऊन तर कधी हलका पाऊस

Solapur Rain Update : जुलै महिना संपत आला तरी अद्यापही सोलापूर जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. पेरणी झाल्यानंतर पिकांसाठी पुरेशा पावसाची अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

Team Agrowon

Solapur Monsoon News : सोलापूर जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी (ता.२५) पहाटेपासून पुन्हा एकदा सुरुवात केली. दिवसभर पावसाची संततधार सुरुच होती. त्यामुळे सूर्यदर्शन होऊ शकले नाही, असे असले तरी या पावसात जोर मात्र नव्हता.

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात काहीसा बदल झाला होता. कधी ढगाळ, कधी ऊन तर कधी हलका पाऊस अशी स्थिती होती. जिल्ह्यातील पंढरपूर, बार्शी, माढा, मोहोळ, करमाळा आणि सांगोला या भागात तर सातत्याने ही परिस्थिती होती. सोमवारी (ता.२४) सायंकाळपासून पुन्हा पावसाने सुरुवात केली. पण तो रात्री दहा वाजता थांबला. पुन्हा मध्यरात्रीपासून मात्र पावसाने सुरुवात केली. तो मंगळवारी (ता.२५) दिवसभर बरसत राहिला.

गेल्या आठवड्यात याच पद्धतीने पाऊस झाला. त्यावेळीही केवळ भीजपाऊसच झाला. आता चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा चांगली सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. पण पुन्हा भीजपाऊसच झाला. या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला. तसेच जिल्ह्यातील बहुतेक सर्व भाग या पावसाने व्यापला, ही त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत प्रशासनाने घेतलेल्या आकडेवारीनुसार सुमारे २४ मिलिमीटर पाऊस झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT