Alibag Rain agrowon
ॲग्रो विशेष

Alibag Rain : अलिबाग परिसरातील वादळात बोटी भरकटण्याचा धोका

Storm Alibag Area : शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या असून, पर्यटन हंगाम सुरू असला तरी बदलत्‍या वातावरणाचा फटका पर्यटन व्यवसायाला बसत असून, पर्यटकांची संख्या रोडावल्‍याचे स्‍थानिक व्यावसायिक सांगतात.

Team Agrowon

Alibag Rain : वादळी वारा व पावसामुळे मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी किनारी आणल्‍या आहेत. शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या असून, पर्यटन हंगाम सुरू असला तरी बदलत्‍या वातावरणाचा फटका पर्यटन व्यवसायाला बसत असून, पर्यटकांची संख्या रोडावल्‍याचे स्‍थानिक व्यावसायिक सांगतात.

हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिल्‍यामुळे खोल समुद्रात गेलेल्‍या शेकडो मासेमारी नौका किनारी परतल्‍या आहेत. मासेमारी हंगामातील शेवटचे दिवस असून, जास्तीत जास्त मासळी पकडून नफा वाढवण्‍याच्या प्रयत्‍नात मच्‍छीमार होते. शेवटच्‍या टप्‍प्‍यासाठी आठ हजार किलोलिटर डिझेल कोटाही मंजूर झाला आहे. त्‍यामुळे मच्‍छीमारांच्‍या आशा पल्‍लवित झाल्‍या होत्‍या, परंतु वादळी हवामानामुळे मच्छीमारांचे शेवटचे तीन आठवडे फुकट जाणार आहेत.

१ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीस बंदी असते. पावसाळ्यात समुद्र खवळत असल्‍याने बोटींना नुकसान होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर हा कालावधी मत्स्यजीवांच्या प्रजननाचा असतो. गतवर्षी पाऊस लांबल्यामुळे मासेमारी बंदीचा कालावधीही वाढवण्यात आला होता.

हवामान विभागाने वादळाची सूचना दिल्यानंतर काही मच्छीमारांनी मासेमारीस जाण्यास टाळले, तर यादरम्‍यान समुद्रात गेलेल्‍या अलिबाग, साखर आक्षी, बोडणी येथील नौका भरकटल्याने नुकसान झाले आहे. पावसाळी वातावरणामुळे अलिबागमधील किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. प्रशासनाकडून वॉटर स्पोर्ट्सलाही बंदी घालण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्र किनारी भागात पर्यटकांनी संख्या कमी झाल्‍याने व्यावसायिक चिंतेत आहेत.

मासेमारीबंदीची अधिसूचना अद्याप आलेली नाही, परंतु नेहमीप्रमाणे १ जूनपासून मासेमारीबंदी होईल, हे सर्व मच्छीमारांना माहिती आहे. मात्र वादळी पावसाचा इशारा दिल्‍याने बोटी किनारी आल्‍या आहेत.

- संजय पाटील, सहाय्यक उपायुक्त, रायगड मत्स्य व्यवसाय विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : संपूर्ण कर्जमाफी, ऊसाला ४ हजार ५०० रुपयांचा दर, धानाला ३ हजार ५०० हमीभाव, महिलांना दरमहा २ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन; अभिनेते विजय यांच्या पक्षाचा जाहीरनामा

Orchard Farmers Support: फळबाग उत्पादकांना आर्थिक आधार

Krishi Seva Kendra: सतरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Onion Storage Tips: कांदा साठवताना होणाऱ्या चुका टाळा, नुकसान वाचवा

Rural Roads Survey: ग्रामपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यांच्या सर्वेक्षणाचा निर्णय

SCROLL FOR NEXT