PM Kisan Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Budget 2024 : पीएम किसान योजनेचा निधी वाढणार?

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana : नैसर्गिक आपत्तीमुळे देशातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे मोदी सरकारकडे मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यावरून मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. तर सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : येत्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी घोषणेची शक्यता आहे. सरकारकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान योजनेच्या रक्कम वाढ केली जाऊ शकते. येत्या काही महिन्यात देशात लोकसभा निवडणूका लागण्याची शक्यता आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अंतरिम अर्थसंकल्प देखील १ फेब्रुवारीला मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. तर प्रमुख्याने शेतकऱ्यांसाठी घोषणा केली जाईल असे बोलले जात आहे.

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) सुरू करण्यात आली आहे. त्यातून वर्षाकाठी शेतकऱ्यांना ६००० हजार रूपये दिले जातात. आता ही रक्कम वाढ करण्याचा विचार सरकार करत आहे. ही रक्कम २००० हजारांनी वाढवली जाऊ शकते. त्यामुळे सध्या मिळणाऱ्या ६००० हजारांवरून ही रक्कम ८००० केली जाऊ शकते.

वर्षाला मिळणार वाढीव २०००

केंद्र सरकार पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २००० रुपये देते. एका वर्षात या योजनेअंतर्गत सरकार ६००० रुपये शेतकऱ्यांना देते. हे हप्ते एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या महिन्यात दिले जातात. तर हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात. तसेच जर सरकारकडून वाढिव रक्कमेवर निर्णय झाला तर शेतकऱ्यांना वाढीव २००० रूपये मिळतील म्हणजेच एका वर्षाला ८००० रूपये थेट बँक खात्यात येतील.

१६ वा हप्ता कधी?

केंद्र सरकारने आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत १५ हप्ते जारी केले आहेत. सरकारने १५ हप्त्यांमध्ये २.७५ लाख कोटींहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. तर १५ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने १५ व्या हप्त्यासाठी १८,००० कोटी रुपयांची रक्कम जारी केली होती. ज्यात ८.५ कोटी शेतकऱ्यांनी १५ व्या हप्त्याचा लाभ घेतला होता. आता शेतकरी १६ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जो फेब्रुवारी ते मार्च दरम्यान सरकारकडून जारी केला जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT