Chavadi Discussion Agrowon
ॲग्रो विशेष

Sustainable Farming : शाश्‍वत शेती पर्यायासाठी ‘चावडी’वर होतेय चर्चा

Chavadi Discussion : शेती क्षेत्राला पूर्ववत शाश्‍वत स्थितीत आणण्याच्या प्रयत्नाअंतर्गत करावयाच्या उपाययोजनांबाबत थेट शेतकऱ्यांचीच मते जाणून घेतली जात आहेत.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Wardha News : वर्धा ः शेती क्षेत्राला पूर्ववत शाश्‍वत स्थितीत आणण्याच्या प्रयत्नाअंतर्गत करावयाच्या उपाययोजनांबाबत थेट शेतकऱ्यांचीच मते जाणून घेतली जात आहेत. त्याकरिता मगन संग्रहालयाच्या वतीने ‘चावडी’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या गिरड परिसरातील तीस गावांत किसान चावडी संवाद उपक्रमाचे आयोजन टप्याटप्याने करण्यात आले आहे. या चावडीवर शेतकऱ्यांना निमंत्रित करून शेतीच्या दुरवस्थेची कारणे आणि तिला पुन्हा शाश्‍वत करण्यासाठी काय करावे ? अशा विषयावर मते जाणून घेण्यावर भर देण्यात आला आहे.

गावातील शेतकऱ्यांना गो-आधारित नैसर्गिक शेतीचा पर्यायही सुचविला जात आहे. शेतकऱ्यांनी घरचे बियाणे, खते आणि कीटकनाशके निर्माण करून त्याचा वापर केल्यास ६० टक्‍के शेती खर्च कमी होणार आहे. त्याकरिता गिरड येथील मगन संग्रहालयाचे समन्वयक गजानन गारघाटे यांनी विनामूल्य शाश्‍वत शेती तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले. चावडीवर विषमुक्‍त पोषक शेतीमाल निर्मिती तसेच त्याचा आहारात वापर करण्याचा सल्ला देण्यात आला. या उपक्रमात गजानन गारघाटे, विष्णू ब्राम्हणवाडे, पवन झाडे आदी जागृती करीत आहेत.

भाजीपाला बाजारमुक्‍त गाव

समुद्रपूर तालुक्‍यातील फरीदपूर ग्रामपंचायतीअंतर्गत फरीदपूर, आर्वी या गावातील महिलांच्या पुढाकाराने घर तिथे रोपवाटिका उपक्रम राबविण्यात आला. १३० पैकी १२७ कुटुंबीयांनी याला प्रतिसाद दिला. त्यातून परसबाग झाल्या. त्याव्दारे भाजीपाला बाजार मुक्‍त गाव ही संकल्पना राबविण्यात आली, अशी माहिती फरीदपूर येथील लक्ष्मी वाकडे यांनी दिली.

चावडी उपक्रमातून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेण्यावर भर दिला आहे. यापुढील काळात उपाययोजनांचा आराखडा तयार होईल. त्यातून शाश्‍वत उपाय सुचविण्यासाठी पुढाकर घेतला जाईल.

- गजानन गारघाटे, समन्वयक नैसर्गिक शेती अभियान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

Maize Farmers: मका उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

Cotton Purchase: हमीभावाचा आधार नाही; कापूस गेला कमी दरात

Animal Market Action: लकडगंजमधील वन्यजीवांच्या बेकायदा बाजारावर होणार कारवाई

Natural Farming: नांदेडला डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाला गती

SCROLL FOR NEXT