Subhash Deshmukh Agrowon
ॲग्रो विशेष

Millet Excellence Center : श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूरमध्येच उभारावे

MLA Subhash Deshmukh : सोलापुर येथील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामती येथे हलविण्याचा शासनाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर राजीनामा देण्याचा इशारा देणारे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी (ता.१२) हिवाळी अधिवेशात हा मुद्दा उपस्थित केला.

Team Agrowon

Solapur News : सोलापुर येथील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामती येथे हलविण्याचा शासनाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर राजीनामा देण्याचा इशारा देणारे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी मंगळवारी (ता.१२) हिवाळी अधिवेशात हा मुद्दा उपस्थित केला. बारामतीला जास्तीचा निधी द्या; आमची काहीच हरकत नाही, पण हे केंद्र सोलापूरमध्येच उभारण्यात यावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनीही या केंद्राबाबत प्रश्न मांडला. हे केंद्र बारामतीला पळविण्यामागचे कारण आम्हाला समजले नाही, ही चुकीची प्रथा आहे, अशा शब्दात सरकारवर प्रहार केला.

सोलापूर येथील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्याचे शासनाचे परिपत्रक नोव्हेंबरमध्ये निघाले होते. त्या वेळी देशमुख यांनी हे केंद्र बाहेर जाणार असेल, तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ, असा इशारा दिला होता. तोच प्रश्न आमदार देशमुख यांनी विधानसभेत मांडला. आमदार देशमुख म्हणाले,

‘‘सोलापूर येथील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामती येथे स्थापन करण्याबाबतचे शासकीय परित्रपक नोव्हेंबरमध्ये निघाले आहे. त्यानंतर श्री अन्न उत्कृष्टता केंद्र जाणार नाही, तर केवळ प्रशिक्षण केंद्र बारामतीला जाणार आहे, अशी चर्चा झाली. पण परिपत्रकामध्ये प्रशिक्षण केंद्र असा उल्लेख नाही. श्री. अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूरऐवजी बारामती येथे स्थापन करावे, असे परिपत्रकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेचे सदस्य नक्की आहेत. बारामती मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी द्यावा, योजना राबवा. पण, सोलापूरचे अन्न उत्कृष्टता केंद्र हे सोलापूरमध्येच व्हायला पाहिजे. सरकारने हे परिपत्रक रद्द करून ते केंद्र सोलापूरमध्ये स्थापन करावे,’’ अशी मागणी देशमुख यांनी केली.

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, की तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात सोलापूरला श्री अन्न उत्कृष्टता केंद्र जाहीर केले होते. पण काही दिवसांपूर्वी शासनाचे परिपत्रक निघाले की, हे अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूरहून बारामती येथे हलविण्यात येणार आहे. बारामतीला केंद्र सुरू करण्याबाबत आमचा विरोध नाही.

पण, सोलापूरचे पळवून बारामतीला नेण्यामागचे लॉजिक आम्हाला कळलेले नाही. सोलापूर हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आहे. अर्थसंकल्पात सोलापूरला हे केंद्र जाहीर करता आणि मध्येच परिपत्रक काढून दुसरीकडे हलवता, ही चुकीची प्रथा सुरू होते आहे. सोलापूरचे श्री अन्न उत्कृष्टता दुसरीकडे कुठेही न हलवता सोलापूरमध्येच करावे, अशी माझी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, असे आमदार शिंदे यांनी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT