Agriculture Pump  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Pump Theft : शिंगवेत कृषिपंपासह केबल, पाइपची चोरी

Latest Agriculture News : शिंगवे गावाच्या पश्चिमेला साकोरे मळा असून, येथील मीना नदी किनारी अनेक शेतकऱ्यांचे कृषिपंप आहेत.

Team Agrowon

Pune News : येथील साकोरे मळ्यातील संदीप वाव्हळ यांच्या शेतातील विजपंपासह केबल, पाइप चोरट्यांनी चोरून नेले आहे. यामध्ये वाव्हळ यांचे अंदाजे ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

शिंगवे गावाच्या पश्चिमेला साकोरे मळा असून, येथील मीना नदी किनारी अनेक शेतकऱ्यांचे कृषिपंप आहेत. संदीप वाव्हळ हे मंगळवारी (ता. २) सकाळी शेतात गेले असता त्यांना कृषिपंप दिसला नाही.

त्यानंतर त्यांनी आजूबाजूला पाहिले असता पाइपांचे कापलेले तुकडे दिसले. तसेच २५ ते ३० फूट केबलदेखील गायब झाली होती. अज्ञात चोरट्यांनी कृषिपंपासहित, केबल, पाइप चोरून नेल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

वळती, नागापूर गावांमधील मीना नदीकिनारी असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या वीजपंपांच्या केबल या पूर्वी अनेकदा चोरी झाल्या आहेत. तसेच मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे लोखंडी ढापेदेखील चोरट्यांनी चोरून नेले आहेत.

हे प्रकार वारंवार घडत असल्याने या परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत. पोलिसांनी चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी भीमाशंकर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT