Mhaisal Irrigation Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Scheme : आष्टी योजनेची कामे दिवाळीपर्यंत पूर्ण करणार

Irrigation Project : आष्टी उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक एक व वितरिका क्रमांक एक व नऊच्या कामाचे भूमिपूजन आमदार माने यांच्या हस्ते करण्यात आले.

Team Agrowon

Solapur News : राज्य सरकारने मोहोळ तालुक्यातील आष्टी सिंचन योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे, येणाऱ्या दिवाळीपर्यंत ही योजना कार्यान्वित करून, शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पाणी पोहोचविण्याचा मानस आहे, असे मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक एक व वितरिका क्रमांक एक व नऊच्या कामाचे भूमिपूजन आमदार माने यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील अध्यक्षस्थानी होते. आमदार माने म्हणाले, की प्रशासनाने ही कामे गतीने कशी होतील, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांची कामे करताना, त्यांच्यासाठी योजना राबवताना शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, तसेच पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पैसेही त्यांना वेळेत द्यावेत. मतदारसंघात रस्त्यांची मोठी कामे सुरू आहेत, मात्र ‘‘ही कामे आम्हीच केली’’ असे म्हणणाऱ्या पैकी मी नाही, असेही आमदार माने यांनी त्यांच्या विरोधकांना टोला लगावला.

यावेळी प्रास्ताविक करताना पाटबंधारे विभागाचे अध्यक्ष अभियंता ज्ञानदेव बागडे म्हणाले, की सन १९९५ /९६ मध्ये या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली. तब्बल २७ वर्षात अनेक लहान-मोठी कामे पूर्ण केली आहेत. या लघू वितरिकेची सुमारे १५ कोटीची कामे आहेत, ही कामे एक वर्षात पूर्ण होणार आहेत, असेही ते म्हणाले.

यावेळी दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, सतीश भोसले, दत्ता पवार, मदन पाटील, पांडुरंग ताटे, चंद्रसेन जाधव, सचिन बाबर, प्रकाश चवरे साहाय्यक अभियंता नारायण जोशी आदीसह आष्टी, पापरी, खंडाळी, शेटफळ गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाण्याचा वापर काटकसरीने करा

लोकनेतेचे अध्यक्ष पाटील म्हणाले, या योजनेमुळे गेल्या पाच वर्षाचा बॅकलॉग भरून निघणार आहे. चालू वर्षी सरासरी पेक्षा पाऊस निम्माच झाला आहे. सर्व भिस्त आता उजनीवर आहे. येणारा काळ शेतकऱ्यांसाठी संकटाचा आहे.

शेतकऱ्यांनी आष्टी तलाव भरून देण्याची मागणी केली होती, ती पूर्ण झाली असुन, सध्या तलावात सर्वात जास्त पाणीसाठा आहे, पण पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन त्यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT