Pm Kisan Samman Nidhi Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

PM Samman Nidhi : ‘शेतकरी सन्मान निधी’चे काम ‘कृषी, महसूल’ करेना

Agriculture Revenue : ‘पंतप्रधान किसान सन्मान’ निधीसंबंधीच्या अडचणी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना दुरुस्ती न करतानाच परत पाठविणे, कुठलीही बाब न एकूण घेणे असा प्रकार सुरू आहे. महसुल प्रशासन या कामाबाबत उदासीन आहे.

Team Agrowon

Jalgaon News : ‘पंतप्रधान किसान सन्मान’ निधीसंबंधीच्या अडचणी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना दुरुस्ती न करतानाच परत पाठविणे, कुठलीही बाब न एकूण घेणे असा प्रकार सुरू आहे. महसुल प्रशासन या कामाबाबत उदासीन आहे.

शेतकऱ्यांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या. पण कुणीही ऐकूण घेत नाही. कानळदा, फुपनहरी, वडली, चिंचोली, तरसोद, सावखेडा येथील शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात शेतकरी सन्मान निधीतील त्रुटी दूर करण्यासाठी अडचणी येत आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किसान सन्मान निधी बँक खाते क्रमांकातील बदल, बँक बदलल्यास इतर कारणांमुळे मिळत नाही. बँका, तलाठी कार्यालयात चकरा मारल्या. कृषी विभागात संपर्क साधला असता तेथून तहसील कार्यालयात जा, असे सांगण्यात आले.

तहसील कार्यालयात शेतकरी सन्मान निधीचे कामकाज सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणी सांगितल्या. वारंवार चकरा मारूनही समस्या मार्गी लागत नसल्याने तेथे आम्ही नाराजी व्यक्त केली. महसूलने सन्मान निधीचे कामच स्वीकारलेले नाही.

महसूलचे कर्मचारी हे काम करीत नाहीत. कृषी विभागाकडे बोट दाखविले जाते. तहसीलदारांना भेटा, असे सांगितले जाते. कृषी विभाग व तहसील कार्यालयात मुजोरी वाढली आहे. शेतकऱ्यांना अपमानित केले जाते.

कर्मचारी, अधिकारी आपले अधिकार गाजवितात व कामे वेळेत करीत नाहीत. कधी नेट बंद आहे, असे सांगतात. अनेकदा दोन ते तीन तास या कार्यालयात थांबावे लागते, पण कुणी याबाबत दखल घेत नाही, अशी नाराजीदेखील या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT