Old Pension Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Old Pension Scheme : नांदेड कृषी विभागाचे कामकाज संपामुळे ठप्प

कृषी विभागामध्ये कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवल्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे.

Team Agrowon

Nanded News : जुनी पेन्शन योजना लागू (Old Pension Scheme) करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून (ता. १४) राज्य कर्मचारी संघटनेने सुरु केलेल्या संपात जिल्ह्यातील कृषी विभागाचे तृतीय व चतूर्थ क्षेणी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

यामुळे क्षेत्रिय स्तरासह कार्यालयीन कामकाज ठप्प झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यात सरकारी-निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर व इतर कर्मचाऱ्यांनी ता. १४ मार्चपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. नांदेड जिल्ह्यातील विविध विभागाचे कर्मचारी संपामध्ये सहभागी झाल्याने कामकाज ठप्प झाले आहे.

या संपामध्ये शिक्षक, शिक्षकेतर, महसूल, कृषी, जिल्हा परिषद या विभागातील कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यामुळे नेहमी गजबजणारे कार्यालयात कालपासून शुकशुकाट दिसून येत आहे.

दरम्यान कृषी विभागामध्ये कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवल्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे. मंगळवारी जिल्ह्यातील तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या तृतीय श्रेणीच्या ५२२ पैकी ३७४ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

तर चतुर्थ श्रेणी ५४ कर्मचाऱ्यांपौकी २४ कर्मचारी संपात सहभागी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली. दरम्यान कृषी विभागात संपामुळे कामावर परिणाम झाला आहे.

कार्यालय स्तरासह क्षेत्रीय स्तरावर सर्व कामे ठप्प झाले आहेत. आजही आजही कर्मचारी संपात सहभागी असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

राजपत्रित अधिकाऱ्यांचा पाठिंबा...

जिल्ह्यात राज्य सहकारी निमसहकारी कर्मचार्‍यांनी जुनी पेन्शन संदर्भात पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला राजपत्रित अधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांचाही संपात सहभाग असल्याचे दिसून येत आहे.

संपात सहभागी कर्मचार्‍यांविरोधात शिस्तभंगाची कार्यवाही करण्यासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांना नकार दिल्याची माहिती सूत्रांने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी १६४ कोटी मदत मंजूर

Summer Moong Sowing: खानदेशात उन्हाळ मूग पेरणीला प्रतिसाद

Sugar Export Ban: साखर निर्यात बंदी म्‍हणजे शेतकऱ्यांची लूट : अशोकराव थोरात

Swachhta Hi Seva Campaign: ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा

Villages Flood Risk: अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावे पुराच्या धोक्यात

SCROLL FOR NEXT