Nashik Market Committee Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Market Committee : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे काम ठप्प

Nashik Market : हमाली, तोलाई, वाराई कपातीसह लेव्हीचा मुद्दा

Team Agrowon

Nashik News : नवीन आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२४ पासून हमाली, तोलाई, वाराई रक्कम शेतकऱ्यांच्या हिशोब पावतीतून कपात न करण्याचा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. तसेच माथाडी-मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई व वाराई कपातीसह लेव्ही संदर्भात तोडगा निघेपर्यंत माथाडी-मापारी कामगारांनी दैनंदिन कामकाजात सहभागी होणार नसल्याचे बाजार समिती प्रशासनास कळविले. त्यामुळे गुरुवारी (ता. ४) नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांतील लिलाव बंद राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यात अडचणी आल्या.

२००८ पूर्वी हमाली, तोलाई वाराई ही रक्कम लेव्हीसह शेतकऱ्यांकडून कपात केली जायची. परंतु २००८ मध्ये औरंगाबाद खंडपीठाने फक्त शेतकऱ्यांच्या हिशोब पावतीतून रक्कम कपात करावी तर लेव्ही रक्कम खरेदीदारांकडून वसूल करावी, असा निर्णय शासनाने घेतला होता.

या निर्णयाविरुद्ध जिल्ह्यातील बाजार समिती व्यापारी असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने हमाली, तोलाई, वाराई कामकाज करणारे माथाडी कामगार नेमके कुणाचे, याचा निर्णय जिल्हा न्यायालयात दावा दाखल करून व्याख्या स्पष्ट करावी, असा निर्णय दिला.

या प्रकरणी निफाड वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने २० सप्टेंबर २०२३ रोजीच्या आदेशाप्रमाणे माथाडी मंडळाने जिल्ह्यातील व्यापाऱ्याकडे थकीत असलेली लेव्ही व दंडात्मक रक्कम वसुली संदर्भात नोटिसा दिल्या. दरम्यान, तोलाई व वाराई कपात होत असल्याने लेव्ही लादली जाते.

त्यामुळे ती कपातच नको, अशी भूमिका व्यापारी संघटनांची आहे. तर आमची मजुरीच कपात होणार नसेल तर आम्हीही कामावर का यायचे, अशी भूमिका माथाडी मापारी कामगारांनी घेतली आहे. हा निर्णय जोपर्यंत लागू होत नाही, तोपर्यंत वजनमापासाठी येणार नाही, असे कामगार म्हणतात, तर लिलावात सहभागी होण्यासाठी तयार आहोत. बाजार समितीने वजन मालाची व्यवस्था करून द्यावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.

थकीत लेव्ही, वसुलीबाबत बैठकीत चर्चा
माथाडी मंडळ अध्यक्ष, व्यापारी संघटना, माथाडी कामगार संघटना, बाजार समिती सभापती व सचिव आदी प्रतिनिधींच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली. त्यात सहविचाराने शेतकरी हितासाठी तोडगा काढून पुढील निर्णयासाठी पाठपुरावा व्हावा, अशी बैठकीत चर्चा झाली. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्याची कार्यपद्धती वेगळी आहे. थकीत लेव्ही व वसुलीची कार्यवाही याबाबत नाशिक जिल्ह्यासाठी स्वतंत्र निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Potato Planter Machine: ट्रॅक्टरचलित बटाटा लागवड यंत्र

Vermicompost Briquettes: व्हर्मी कंपोस्ट, डीएपी खताचेही तयार होणार ब्रिकेट

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्पाच्या खर्चाची किंमत निश्चित

Farm Loan Waiver Controversy: कृषी कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक

Pulses Processing Subsidy: कडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी २५ लाखांचे अनुदान

SCROLL FOR NEXT