Jal Jeevan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : ‘जलजीवन मिशन’च्या कामांना गती द्यावी ः उपमुख्यमंत्री पवार

Jal Jivan Mimssion : भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यांसह जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी या कामांना गती द्यावी.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यातील भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यांसह जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी या कामांना गती द्यावी. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नांदेड जिल्ह्यात सुरू असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सद्यःस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बुधवारी (ता. १७) नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील जलजीवन मिशनच्या व वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते.

या बैठकीला खासदार अशोक चव्हाण (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अभिषेक कृष्णा, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत १२३४ कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, तर २८ पाणीपुरवठा योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत राबविण्यात येत आहेत.

यामध्ये भोकर विधानसभा मतदार संघातील भोकर, अर्धापूर व मुदखेड तालुक्यात १२२ जिल्हा परिषदेच्या दोन योजनांची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत सुरू आहेत. ही सुरू असणारी कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी या कामांना गती द्यावी. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सुरू असणाऱ्या कामांच्या सद्यःस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT