Solapur ZP  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur ZP : ग्रामसेवक, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामकाज ऑनलाइन दिसणार

Solapur Zila Parishad : जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक, आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचारी यांचे कामकाज ऑनलाइन दिसेल, असे अॅप आम्ही तयार करत आहोत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Solapur News : जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक, आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचारी यांचे कामकाज ऑनलाइन दिसेल, असे अॅप आम्ही तयार करत आहोत. त्याबाबत ग्रामसेवक तसेच आरोग्य कर्मचारी संघटनेशी चर्चा करून लवकरच हे ॲप विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली.

ग्रामसेवक गावामध्ये किती वेळ राहतो? आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रात किती वेळा असतात, असे प्रश्‍न वारंवार उपस्थित होतात. त्यासाठी जिल्हा परिषदेचे हे ॲप काम करू शकेल.

या अॅपच्या माध्यमातून ठरावीक मर्यादेमध्ये जेव्हा ग्रामसेवक आणि आरोग्य कर्मचारी आल्यास त्या ॲपमध्ये त्यांच्या कामकाजाची माहिती कळेल, ते आपल्या कामकाजाची माहिती त्या ॲपमध्ये नोंद करू शकतील, असे आव्हाळे म्हणाल्या.

महामार्गात गेलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा त्याचाही प्रश्‍न बऱ्यापैकी मिटला आहे, हद्दवाढ भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला आहे, असे सांगून येणाऱ्या नवीन वर्षामध्ये ग्रामपंचायत, आरोग्य आणि शिक्षण या तीन विभागावर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

या वर्षात ‘उमेद’अभियान अंतर्गत असलेल्या बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाइन मार्केट मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सोलापुरातील डॉ. आंबेडकर चौकात असलेल्या नेहरू वसतिगृहाचे दोन गाळे बचत गटाच्या वस्तू विक्रीसाठी देण्यात येणार आहेत, अशी माहितीही आव्हाळे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT