Girna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Level : गिरणा धरणातील पाणीसाठा घटला

Water Stock : खानदेशात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा घटत असून, हा साठा सुमारे २३ टक्के एवढाच राहिला आहे. गिरणा धरणातील साठा सुमारे १६ टक्के एवढाच आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा घटत असून, हा साठा सुमारे २३ टक्के एवढाच राहिला आहे. गिरणा धरणातील साठा सुमारे १६ टक्के एवढाच आहे. जलसाठा घटत असल्याने पुढे चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये आहे. पण या धरणाचा लाभ जळगाव जिल्ह्यास अधिक आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव या तालुक्यांमधील अनेक गावांमधील टंचाई दूर करण्यासाठी या धरणातून पाणी सोडले जाते. तसेच रब्बीत २१ हजार हेक्टरला लाभ मिळतो.

या धरणातून तीनदा नदीत पाणी सोडले आहे. तर रब्बीसाठी देखील तीनदा आवर्तन सुटले होते. धरणाची साठवण क्षमता १८ टक्के एवढी आहे. हे धरण मागील चार वर्षे १०० टक्के भरले होते. परंतु गेल्या पावसाळ्यात धरणात ५६ टक्केच जलसाठा होता. यामुळे धरणातील पाण्याचा लाभ रब्बीला मिळाला नाही. गिरणा काठच्या गावांना टंचाईचे चटके बसत आहे. पण सद्यःस्थितीत धरणात फक्त १६ टक्के जलसाठा आहे. त्यातून काही दिवसांपूर्वी टंचाई निवारणार्थ नदीत पाणी सोडले होते. यामुळे जलसाठा आणखी घटला आहे.

तापी नदीवरील हतनूर (ता. भुसावळ) धरणातील जलसाठा सध्या स्थिर आहे. त्याचे दोन दरवाजे मागील रविवारी (ता.१६) उघडले होते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढली. यामुळे त्याते दोन दरवाजे सुमारे दोन मीटरने उघडले होते. परंतु या धरणात ५४ टक्के गाळ असल्याने जलसाठा हवा तेवढा नसतो. औष्णिक विद्युत प्रकल्प, वरणगाव (ता. भुसावळ) येथील आयुध निर्माणी, भुसावळ शहर, जळगाव येथील औद्योगिक वसाहत व नदीकाठच्या सुमारे १० गावांमधील टंचाई निवारणार्थ हतनूरमधून पाणी सोडले जाते.

धरणांमध्ये खडखडाट

जळगाव जिल्ह्यातील बहुळा, अंजनी, मन्याड, तोंडापूर, अभोरा, मंगरूळ, सुकी, मोर, गूळ या धरणांतील साठाही मिळून ३५ टक्क्यांखाली आहे. धुळ्यातील अनेर, पांझरा, अमरावती, सोनवद, बुराई या प्रकल्पातील साठाही २२ टक्के एवढाच असल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT