Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : होनसळला चार एकरातील सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर

Kharif Crop : पावसाने दडी मारल्याने तग धरुन राहिलेले सोयाबीनही माना टाकू लागल्याने होनसळ (ता.उत्तर सोलापूर) येथील शेतकऱ्याने सुमारे चार एकरवरील सोयाबीनवर ट्रॅक्टर चालवत ते काढून टाकले.

Team Agrowon

Solapur news : यंदा पाऊस कमी झाल्याने पेरणी केलेले बियाणे उगवले नाही. परिणामी, उत्तर सोलापूर तालुक्यात काहींना दुबार तर काही शेतकऱ्याना तिबार पेरणी करावी लागली, असे असताना पुन्हा पावसाने दडी मारल्याने तग धरुन राहिलेले सोयाबीनही माना टाकू लागल्याने होनसळ (ता.उत्तर सोलापूर) येथील शेतकऱ्याने सुमारे चार एकरवरील सोयाबीनवर ट्रॅक्टर चालवत ते काढून टाकले.  

होनसळ येथील शेतकरी विलास साखरे यांनी यावर्षी खरीप हंगामात सोयाबीनची लागवड केली होती. यंदा कधी नव्हे, ती चार एकरवर त्यांनी सोयाबीन केले. सुरवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणामुळे पेरणी काहीशी खोळंबली होती. पण त्यातूनही पुन्हा त्यांनी पेरणी केली. त्याची वाढही चांगली झाली होती.

अलीकडेच त्यात आंतरमशागत करून डवरणी, खुरपणीची कामेही त्यांनी पूर्ण केली होती. आता पुढे या सोयाबीनला चांगल्या शेंगा लागून भरपूर उत्पादन पदरी पडेल, अशी त्यांना आशा होती. पण मागील काही दिवसात अचानकपणे सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव होऊन सोयाबीनच्या झाडाच्या पानाची पूर्ण चाळणी झाली. त्यात पाऊसही लांबत चालल्याने सोयाबीन माना टाकू लागले. त्यामुळे निराश झालेल्या विलास साखरे आणि त्यांचे चिरंजीव रोहित साखरे यांनी थेट सोयाबीनवर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटावेटर फिरवून सोयाबीनचे पीक काढून टाकले.

खरीप आमचा हातचा गेला आहे, आता रब्बीवरच सगळी भिस्त आहे. पण तेही पावसावर, त्यामुळे सरकारनेच आता विचार करुन शेतकऱ्यांना मदतीसाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.
विलास साखरे, शेतकरी, होनसळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Training: पवारवाडीत महिलांना शेतीविषयक धडे

Farmers Protest: ऊस बिलासाठी म्हेत्रेंच्या घरासमोर बेमुदत उपोषण सुरू

Ahilyanagar Zilla Parishad: अहिल्यानगरला ३८ महिलांना मिळणार जिल्हा परिषदेत संधी

Solapur Zilla Parishad: विजय डोंगरे, उमेश पाटलांना संधी, साठेंची अडचण वाढली

Crop Protection: कीड-रोगावर नियंत्रणासाठी पीक निरीक्षणाची गरज 

SCROLL FOR NEXT