Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : सलग चौथ्या वर्षी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२३) खरीप हंगामात विविध बँकांना १ हजार ३८४ कोटी १७ लाख रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. परंतु यंदा (ता. ३० सप्टेंबर अखेर) एकूण १ लाख ४ हजार १५८ शेतकऱ्यांना ८३८ कोटी ४२ लाख रुपये (६०.५७ टक्के) करण्यात आले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक यांनी उद्दिष्टाहून अधिक पीककर्ज वाटप केले. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्जवाटप ४० टक्क्यांच्या, तर खासगी बँकांचे कर्जवाटप २० टक्क्यांच्या आतच राहिले. जिल्ह्यात सलग चौथ्या वर्षी खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले आहे.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील विविध बँकांना १ हजार ३८४ कोटी १७ लाख रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीयीकृत बँकांना ८९३ कोटी २६ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला २०९ कोटी ९४ लाख रुपये, जिल्हा बँकेला १६४ कोटी ९३ लाख रुपये, खासगी बँकांना ११६ कोटी ४ लाख रुपये उद्दिष्ट होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदा सुरुवातीपासून हात आखडता घेतल्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांचे ८९३ कोटी रुपये पैकी ३४३ कोटी रुपये (३८.४२ टक्के), तर खासगी बँकांचे ११६ कोटी ४ लाख रुपये पैकी २१ कोटी रुपये (१८.८० टक्के) एवढे झाले.

जिल्हा सहकारी बँकेला १६४ कोटी ९३ लाख रुपये उद्दिष्ट असताना १८१ कोटी ६१ लाख रुपये (११०.११ टक्के), तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेला २०९ कोटी रुपये उद्दिष्ट असताना २९१ कोटी ८२ लाख रुपये (१३९ टक्के) पीककर्ज वाटप केले.

यंदाच्या खरिपातील एकूण पीककर्ज वाटपामध्ये ५३ हजार ८१७ शेतकऱ्यांना ३१६ कोटी ५३ लाख रुपये नवीन पीककर्ज व ५० हजार ३४१ शेतकऱ्यांनी केलेल्या ५२१ कोटी ८९ लाख रुपये एवढ्या रकमेचे नूतनीकरण केलेल्या रकमेचा समावेश आहे.

बँकनिहाय २०२३ खरीप पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये)

बँक उद्दिष्ट वाटप रक्कम टक्केवारी शेतकरी संख्या

महाराष्ट्र ग्रामीण बँक २०९.९४ २९१.८२ १३९.०० २९१८२

जिल्हा सहकारी बँक १६४.९३ १८१.६१ ११०.११ ४०३२१

भारतीय स्टेट बँक ५७२.७७ २४५.६० ४२.८८ २३४५३

बँक ऑफ बडोदा ६५.९२ .१२.७४ १९.३३ १११७

बँक ऑफ इंडिया ११.८२ ३.५० २९.६१ २९५

बँक ऑफ महाराष्ट्र ७९.९० ३६.९५ ४६.२५ ३००१

कॅनरा बँक ४७.३८ ८.९३ १८.८५ ९६३

सेंट्रल बँक ऑफ इंडिया १२.२२ ५.६६ ४६.७० ४८०

इंडियन बँक २४.१४ ६.७७ २८.०४ ६६७

इंडियन ओव्हरसीज बँक १०.४१ ५.२९ ५०.८२ ४४९

पंजाब नॅशनल बँक १०.८६ २.८८ २६.५२ २१०

युको बँक २३.६८ ३.२५ १३.७२ ३२५

युनियन बँक ऑफ इंडिया ३४.२६ ११.६१ ३३.८९ ४९८

अॅक्सिस बँक १२.५३ ०.२१ १.६८ २

एचडीएफसी बँक ३८.२७ ३.४४ ८.९९ ३१४

आयसीआयसीआय बँक ३०.२१ १०.९६ ३६.२८ ७२७

आयडीबीआय बँक ३५.०३ ७.२० २०.५५ १०३२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT