Tribal Development Department Recruitment  Agrowon
ॲग्रो विशेष

Tribal Development Department Recruitment : आदिवासी विकास विभागातील स्थगित भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार

Dr. Vijayakumar Gavit : आदिवासी विकास विभागातील सुधारित ६१६ पदांच्या गट-क संवर्गातील भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

Roshan Talape

Pune News : आदिवासी विकास विभागातील सुधारित ६१६ पदांच्या गट-क संवर्गातील भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु होईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग यांच्या स्तरावर २३ नोव्हेंबर २०२३ ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत जाहिरात प्रसिद्ध केली होती. या विभागामार्फत गट-क संवर्गातील ६०२ विविध रिक्त पदांकरिता ऑनलाइन अर्जही मागविण्यात आले होते.

परंतू शासन निर्देशानुसार जाहिरातीत एसईबीसी संवर्गाचा समावेश केला नसल्याकारणाने राज्य सरकारने या पदभरतीस स्थगितीचे आदेश दिले होते. त्यामुळे ही पूर्वीची जाहिरात स्थगित करण्यात आली होती.

या कारणास्तव, २६ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या महाराष्ट्र अधिनियम क्र.१६ अन्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) या संवर्गाचा समावेश करून, त्यानुसार बिंदुनामावली अद्ययावत करून गट-क याच भरतीसाठी नव्याने सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. अशी माहिती आदिवासी विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये दिलेली होती.

सरकारच्या या आदेशानुसार आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून बिंदूनामावली अद्ययावत करण्याची प्रकिया पुर्ण झालेली आहे. त्यामुळे आता आदिवासी विभागाची नव्याने सुधारित जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तसेच पदभरतीतील गट-क संवर्गातील विविध पदे भरली जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाकडून मिळाली आहे.

गट-क संवर्गातील आदिवासी विकास विभागात भरली जाणारी पदे

वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, संशोधन सहाय्यक,

उपलेखापाल – मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरिक्षक,

वरिष्ठ लिपिक – सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक,

गृहपाल (पुरुष),

गृहपाल (स्त्री),

अधीक्षक (पुरुष),

अधिक्षक (स्त्री),

ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक,

वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक,

संशोधन सहाय्यक,

उपलेखापाल/ मुख्य लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ),

सहाय्यक ग्रंथपाल, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी,

कॅमेरामन – कम – प्रोजेक्टर ऑपरेटर,

उच्च श्रेणी लघुलेखक,

निम्न श्रेणी लघुलेखक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

SCROLL FOR NEXT