Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : 'कुर्मदास कारखान्याच्या गाळपा हंगामास प्रारंभ

Sugarcane Crushing Season : कारखान्याच्या येत्या गळीत हंगामामध्ये गळितास येणा-या उसास आसपासच्या इतर कारखान्याच्या बरोबरीने दर देण्यात येणार आहे.

Team Agrowon

Solapur News : संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचा २०२४-२५ चा १५ वा गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे संस्थापक चेअरमन ॲड. धनाजी साठे, व्हाइस चेअरमन सुधीर पाटील व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे, उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या उपाध्यक्षा गीतांजली देशमुख, नगरपंचायतीच्या व मंडळाच्या सर्व सदस्या यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी सत्यनारायण व काटापूजन कारखान्याचे ज्येष्ठ कर्मचारी बालाजी देवकर व त्यांची पत्नी नीता देवकर या दांपत्याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अॅड. धनाजी साठे यांनी सांगितले, हंगामामध्ये २.०० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यादृष्टीने कारखान्याची मशिनरी तसेच ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज आहे.

कारखान्याच्या येत्या गळीत हंगामामध्ये गळितास येणा-या उसास आसपासच्या इतर कारखान्याच्या बरोबरीने दर देण्यात येणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ही मागील हंगामात चांगले सहकार्य केलेले असून याही हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला नोंदवलेला संपूर्ण ऊस संत कुर्मदास कारखान्यास गाळपासाठी देवून सहकार्य करावे, असे आवाहन केले.

यावेळी कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, भालचंद्र पाटील, हरिदास खताळ, राहुल पाटील, विठ्ठल शिंदे, बाळासाहेब पाटील, नारायण गायकवाड, संजय इंगळे, मार्गदर्शक बी. डी. पाटील, प्रियदर्शनी महिला विकास मंडळाच्या सदस्या अर्चना राऊत, हर्षदा बागल, कनिष्का साठे, भाऊ वाघ, वेदांत साठे, सचिन पाटील, नगरसेवक नितीन साठे, प्रतापसिंह कदम, प्रशांत पाटील, कार्यकारी संचालक श्री. झुंजार आसबे, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद शेतकरी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: वादळी पावसासह उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

LPG Price Hike Protest: गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Sugarcane Crop Disease: उसावरील चाबूक काणी, गवताळ वाढ रोगाचे नियंत्रण

Summer Groundnut Cultivation: अकोल्यात उन्हाळी भुईमूग लागवड दिलासादायक

Minister Dr. Pankaj Bhoyar: वेतनेतर अनुदान धोरणाचे पुनर्विलोकन करण्याचे प्रस्तावित

SCROLL FOR NEXT