Wheat stocks Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat stocks : देशात गव्हाचा साठा घटला ?

Wheat stocks plunge : जगाच्या पाठीवर दुसऱ्या क्रमांकावर गहू उत्पादन करणाऱ्या देशातच सध्या गव्हाचा साठा घटल्याचे समोर येत आहे. त्यामुळे गव्हाची किंमत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्र सरकारकडून महागाई नियंत्रित आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. यात निर्यातबंदी सारखा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे देशातील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. तर सरकारने गहू आणि बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. दरम्यान देशातील गव्हाचा साठ्यात घट झाल्याचे समोर आले आहे. तर हा साठा गेल्या सात वर्षात नीचांकी पातळीवर पोहचल्याचेही आहे. त्यामुळे गव्हाच्या किंमतीवर याचा परिणाम होऊन त्या वाढण्याची शक्यता आहे.

महागाई नियंत्रित आणण्यासाठी सरकारकडून गहू आणि बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे घाऊकसह मोठ्या विक्रेत्यांना १००० टना पेक्षा जास्त गहू ठेवता येणार नाही. दरम्यान केंद्राने देखील भारतीय अन्न महामंडळातर्फे गव्हाचा साठा खुल्या बाजारात विक्रीसाठी काढला आहे.

यावेळी हिंदुस्तान टाईम्समध्ये आलेल्या बातमीच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२४ पर्यंत भारतीय अन्न महामंडळ आणि राज्य संस्थांकडे गव्हाचा साठा हा १६३.५ लाख टन होता. २०२१ मध्ये गव्हाचा सर्वाधिक साठा झाला होता. तेव्हा गव्हाचा साठा हा ३४२.९० लाख टन झाला होता. २०२२ मध्ये हाट साठा ३३०.१२ लाख टन होता. तर २०२३ मध्ये हा साठा १७१.७० लाख टनावर आला. ज्यात मोठा घसरण झाल्याचे दिसत आहे. पण सध्याच्या घडीला देशात गव्हाचा 'बफर स्टॉक' हा १३८ लाख टनांचा आहे. जो गरजेपेक्षा अधिक आहे.

सध्या गव्हाची कमतरता भासत असून गव्हाच्या किंमती देखील वाढत आहेत. गेल्या पंधरा महिन्यात ती वाढल्याचेच दिसत आहे. ज्यात किरकोळ धान्यांच्या किंमती या ९.९३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारकडून 'बफर स्टॉक'मधील गहू आणि तांदूळ बाहेर काढण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT